कैलास पुरी, www.24taas.com, पुणे
‘पर्यावरण वाचवा’ अशी ओरड होत असताना, सरकार आणि प्रशासन काही पर्यावरणाचा मुद्दा गंभीरतेनं घेत नाही. पुण्यातल्या जुन्नरमध्ये बाभळीच्या झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. झाडं वाचवण्यासाठी आता ग्रामस्थच कोर्टात गेले आहेत.
पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या येडगाव धरणाजवळ बेकायदेशीररित्या बाभळीची झाडं तोडण्यात येत आहेत. फक्त अकराशे झाडं तोडण्याचं टेंडर देण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात १५ हजार झाडांवप सर्रास कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय.
या बाबतीत अधिका-यांना विचारलं तर, काम कायदेशीरपणे सुरू असल्याचं तेही मान्य करत आहेत. जलसिंचन विभागाच्या या भोंगळ कारभाराविरोधात ग्रामस्थांनी कोर्टात दाद मागितलीय. एकीकडे सरकार पर्यावरण वाचवण्यासाठी अनेक योजना करतंय. पण दुसरीकडे झाडांच्या कत्तलीकडे मात्र डोळेझाक केली जातेय. अशामुळेच विकासाकडे नव्हे तर ऱ्हासाकडेच वाटचाल सुरू आहे.