मुंबईकरांसाठी पुढचे 4 तास धोक्याचे, हवामान खात्याचा इशारा

मुंबई आणि उपनगरात पावसाची उसंत नाहीच, पुढचे 4 तास कोसळधार, हवामान खात्याचा इशारा   

Updated: Jul 5, 2022, 05:29 PM IST
मुंबईकरांसाठी पुढचे 4 तास धोक्याचे, हवामान खात्याचा इशारा title=

मुंबई : मुंबई, ठाणे उपनगर आणि मुंबईत पहाटेपासून पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. पाऊस जराही उसंत घ्यायचं नाव घेत नाही. रिमझिम तर कधी धुवांधार पाऊस सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीची दाणादाण उडाली आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. आता मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. 

हवामान विभागाने इशारा दिला आहे. मुंबईकरांसाठी पुढचे 4 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. पुढच्या 4 तासाच मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत पुढच्या चार तासांत पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळू शकते. 

मुंबईकरांनो तुमचं काम कसेल तरच घराबाहेर पडा. मुंबईत सोमवारी रात्रभर जोरदार पाऊस झाला. परिणामी सखल भागात साचलं पाणी हवामान विभागाकडून मुंबईसह उपनगरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे तीन दिवस मुंबई पाऊस राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घरातून निघताना थोडं लवकरच निघा. कारण वाहतुकीवर पावसामुळे परिणाम होऊ शकतो. 

 

दुसरीकडे राज्यातील पावसासंदर्भात हवामान खात्यानं अलर्ट दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचे निर्देश दिले आहेत. कोकणातही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.