Dating App वापरत तरुणानं गर्लफ्रेंड नव्हे, बहिण शोधली; साजरा करणार पहिलं Rakshabandhan

मुंबईतील अशाच एका बहिणवेड्या भावाने एक भन्नाट शक्कल लढवली.

Updated: Aug 10, 2022, 01:12 PM IST
Dating App वापरत तरुणानं गर्लफ्रेंड नव्हे, बहिण शोधली; साजरा करणार पहिलं Rakshabandhan  title=
trending news man looking for sisters on tinder to raksha bandhan check viral on social media in marathi

Sisters On Tinder - बहिण-भावाच्या प्रेमाचं पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). गुरुवारी भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार. पण भाऊ किंवा बहिण असणारे अनेक जण आहेत. ज्यांना हा सण एका भावाची किंवा बहिणीची कमी जाणिव करुन देतो. 

पण मुंबईतील अशाच एका बहिणवेड्या भावाने एक भन्नाट शक्कल लढवली. त्याची ही भन्नाट आयडिया सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे. या भावाने एका अॅपवर बहिण हवी अशी जाहिरातच देऊन टाकली. (trending news man looking for sisters on tinder to raksha bandhan check viral on social media in marathi)

हो, अगदी बरोबर बहिण हवी अशी जाहिरात आणि ती पण अख्खा जगात प्रसिद्ध अशा डेटिंग अॅप. टिंडर (Tinder) या डेटिंग अॅपवर त्याने गर्लफेन्ड नाही तर चक्क बहिणीचा शोध घेतला. विशेष म्हणजे त्याचा या पोस्टला तुफान प्रतिसाद मिळाला. 

मुंबईतील एका तरुणाने Reddit वर बहिणीचा शोध घेण्यासाठी एक पोस्ट केलं. या पोस्टनंतर दोन दिवसांमध्ये 500हून अधिक अपव्होट्स त्याला मिळाले. या पोस्टसाठी यूजर्सने तरुणांचं अभिनंदन केलं आहे. 

बहिण हवी आहे!

''आयुष्यातील प्रत्येक रक्षाबंधनाच्या दिवशी मला बहिण नसल्यामुळे FOMO जाणवायचं. मला राखी बांधण्यासाठी बहिण नाही आणि मला त्यांना भेटवस्तू द्यायच्या आहेत. असो, गेल्या 2 वर्षांपासून मी रक्षाबंधनाच्या 2 आठवड्यापूर्वी खालीलप्रमाणे बायो टाकत असतो.'' "रक्षाबंधनाच्या वेळी हँगआउट करण्यासाठी बहिणीचा शोध घेत आहे".

तरुणाच्या या मोहीमेला यश आलं आहे, गुरुवारी या तरुणासोबत रक्षाबंधन साजरा करण्यासाठी एक नाही तर आता दोन बहिणी आहेत.  

या तरुणाने टिंडर या अॅपचे आभार मानले आहेत. तसंच तो म्हणाला आहे की, ''यावर्षी मी रक्षाबंधनासाठी खूप उत्साहित आहे. आम्ही तिघेजण रक्षाबंधनाला एकमेकांना गिफ्ट देऊन हे रक्षाबंधन साजरा करणार आहोत.''