मुंबई : एका सरकारी बँकेने (Governmemnt Bank) मोठे पाऊल उचललं आहे. या बँकेने एफडीवरील व्याज दर वाढवलं आहे.याचा थेट फायदा हा त्या बँकेत एफडीत गुंतवणूक केलल्यांना होणार आहे. कॅनरा बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन दर 7 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहेत. व्याजदरात वाढ केल्याने ग्राहकांना अतिरिक्त पैसेही मिळतील. (public sector canara Bank hikes interest rate on fixed deposits know details)
बँकेने 7 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या FD वरील व्याजदर 35 बीपीएस (BPS) अंकांनी वाढला आहे. त्यामुळे व्याज दर 2.90% वरून वरून 3.25% इतके टक्के झाला आहे. तसेच 46-90 दिवसात परिपक्व होणाऱ्या एफडीवर 25 बीपीएसने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ने 4% वरून 4.25% ने वाढ केली आहे. याशिवाय 91-179 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर आता 4.50% दराने व्याज मिळेल, पूर्वी ते 4.05% होते. यात 45 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. शिवाय 180 दिवस ते 269 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 5.90% व्याज मिळेल. पूर्वी तो 4.65% होता. यामध्ये 125 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.
याशिवाय कॅनरा बँकेने 270 दिवसांपासून एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या FD वर 135 बेस पॉइंट्सने (bps) वाढ केली आहे. त्यामुळे हा व्याजदर 4.65% वरून 6 टक्के झाला आहे. बँकेने 1 वर्ष ते 2 वर्षांच्या मुदतीच्या FD वरील व्याजदर 5.50% वरून 6.50% पर्यंत वाढवला आहे. त्यात 100 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. शिवाय 1 वर्ष किंवा त्याहून अधिक मुदतीच्या पण 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वरील व्याजदर 5.55% वरून 6.50% करण्यात आला आहे. यामध्ये 95 bps ने वाढ केली आहे.
666 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवरील व्याजदर 6% वरून 7.00% झाला आहे. 2 वर्ष किंवा त्याहून अधिक मुदतीच्या पण 3 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वरील व्याजदर 5.60% वरून 6.50% पर्यंत वाढला असताना त्यात 100 आधार अंकांची वाढ करण्यात आली आहे. त्यात 90 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.
कॅनरा बँकेने 3 वर्षात आणि त्याहून अधिक मुदतीच्या FD वरील व्याजदर 5.75% वरून 6.50% पर्यंत वाढवला आहे. त्यात 75 bps ने वाढ करण्यात आली आहे आणि 5 वर्षात आणि त्याहून अधिक मुदतीच्या FD वरील व्याजदर 5.75% वरून 7.00 पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यात 125 bps ने वाढ झाली आहे.