मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्तीची गरज काय ? - नारायण राणे

 मराठा समाज आरक्षणासाठी घटना दुरुस्तीची गरज  नाही, अशी रोखठोक भूमिका राणे यांनी व्यक्त केली.

Updated: Jul 31, 2018, 07:52 PM IST
मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्तीची गरज काय ? - नारायण राणे title=

मुंबई : राज्यात सध्या मराठा समाज आरक्षणाचा मुद्दा जोरदार पेटलाय. ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात आली. अद्याप आंदोलने सुरु आहेत. दरम्यान, वेळप्रसंगी मराठा समाज आरक्षणासाठी राज्य घटनेत दुरुस्ती करण्याची अनेक राजकीय नेत्यांनी मागणी केली. यावर मराठा समाज आरक्षणासाठी घटना दुरुस्तीची गरज  नाही, अशी रोखठोक भूमिका माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणाचे आंदोलन थांबावायला हवं, असे आवाहन खासदार नारायण राणेंनी केले आहे. झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत नारायण राणे यांनी मराठा आरक्षणासाठी सध्या सुरू असलेल्या हिंसक आंदोलनामागे राजकीय पक्ष असल्याचा आरोपही केलाय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलंय. त्यांनी महाराष्ट्राच्या प्रतीमेला काळीमा लागेल, अशा घटना रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही राणेंनी म्हटलंय. शिवाय मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्तीची गरज नसल्याचंही त्याचं म्हणणं आहे.