भेंडीबाजार इमारत दुर्घटनेत ११ ठार, २२ जण जखमी

 भेंडीबाजार येथील इमारत दुर्घटनेत ११ ठार, एकूण २२ जण जखमी झालेत. यात अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश आहे. ११ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलेय. ही इमारत पाच मजली होती, हे आता स्पष्ट झालेय.

Updated: Aug 31, 2017, 02:15 PM IST
भेंडीबाजार इमारत दुर्घटनेत ११ ठार, २२ जण जखमी title=

मुंबई : भेंडीबाजार येथील इमारत दुर्घटनेत ११ ठार, एकूण २२ जण जखमी झालेत. जखमींमध्ये अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश आहे. ११ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलेय. ही इमारत पाच मजली होती, हे आता स्पष्ट झालेय.

भेंडीबाजार परिसरातील या ३ मजली इमारतीवर आणखी दोन मजले चढविण्यात आले होते. इमारत खूप जुनी होती. ही इमारत खाली करण्यासाठी म्हाडाकडून नोटीसही देण्यात आलेली होती. तरही इमारतीत लोक राहत होते. सकाळी ८.३२ वाजता इमारत कोसळली तेव्हा इमारतीत ३ ते ५ कुटुंब राहत होती. एका खोलीत १० ते १५ लोक राहत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ढिगाऱ्याखाली १५ ते २० जण अडकल्याची भिती व्यक्त होत आहे.

सकाळी ८.५० च्या दरम्यान, ढिगाऱ्याखालून चार मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. यात एका चिमुकलीचा समावेश आहे. घटनास्थळी अग्नीशामन दलाचे जवान पोहोचले आहे. ढिगारा उपसताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला. इमारत ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.या इमारत दुर्घटनेत ५ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आलेय.  

दरम्यान, १५  ते २० जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या इमारतीत ५ कुटुंब राहत होते. इमारतीमधील एका खोलीत सुमारे ८ ते १५ लोक राहत होती. त्याचसोबत इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरमघ्ये मिठाईवाल्याचे वर्कशॉप होते. येथे १५-२० कर्मचारी काम करत होते. त्यामुळे आणखी लोक ढिगाऱ्याखाली दबल्याचे सांगण्यात येत आहे.