मुंबईत भरदिवसा अपहरणाचा प्रयत्न, मुलीनं दाखवलं शौर्य

घाटकोपरच्या भटवाडी विभागात पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीने अपहरणाचा प्रयत्न शौर्याने उधळून लावला. 

Updated: Aug 16, 2017, 07:53 PM IST
मुंबईत भरदिवसा अपहरणाचा प्रयत्न, मुलीनं दाखवलं शौर्य title=

मुंबई : घाटकोपरच्या भटवाडी विभागात पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीने अपहरणाचा प्रयत्न शौर्याने उधळून लावला. सोमवारी दुपारी ३ वाजणाच्या सुमाराला सातवीत शिकत असलेली मुलगी स्वच्छतागृहात जात असताना दोन अज्ञात इसम शाळेच्या आवारात शिरले. त्यांनी मुलीचं तोंड दाबून तिला रिक्षात बळजबरी बसवलं.

रिक्षा असल्फाजवळ ट्रॅफीकमध्ये अडकल्यावर या मुलीने एकाच्या हाताचा चावा घेत आरडाओरडा करून तिथून पळ काढला. रस्त्यावरील लोकांनी या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. पण आरोपींनी तिथून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी तीन अज्ञातांवर गुन्हा नोंदवलाय.