मुंबई : मध्य रेल्वेकडून सीएसटी रेल्वे स्थानकाच्या नावात बदलाची अधिसूचना जारी झाल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असणारं नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असं झालं आहे. त्यामुळे उद्घोषणाही नव्या नावाने ऐकायला मिळत आहेत.
शिवाय आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या नवीन नावाचा फलकही स्टेशनमध्ये लावण्यात आलं आहे. रेल्वे स्थानकाचं नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असलं तरी स्टेशन कोड ‘CSTM’ कायम राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.