फोटो काढण्यावरुन क्लिनअप मार्शलला नागरिकाकडून मारहाण, व्हीडिओ व्हायरल

 मुंबईकर (Mumbai) आणि क्लिन अप मार्शल (Cleanup Marshal) मधले वाद सुरूच आहेत.   

Updated: Sep 13, 2021, 05:24 PM IST
 फोटो काढण्यावरुन क्लिनअप मार्शलला नागरिकाकडून  मारहाण, व्हीडिओ व्हायरल title=

मुंबई : राज्यात कोरोनाचा (Corona) शिरकाव झाल्यानंतर अनेक नियम कडक करण्यात आले. कोरोनाला रोखण्यासाठी मास्क आवश्यक आहे. सरकारकडून वारंवार मास्क घाला, असं आवाहन केलं जातं. मात्र काही जण ऐकत नाहीत. या अशा बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी मुंबईत महानगरपालिकेने (MCGM) क्लीन अप मार्शलची (Cleanup Marshal) नियुक्ती केली. रस्त्यावर थुंकणाऱ्या आणि मास्क न घालणाऱ्यांवर हे मार्शल दंड आकारतात. या दंडावरुन अनेकदा मुंबईकर (Mumbai) आणि या मार्शलमध्ये वाद होतात. यात आणखी एका वादाची भर पडली आहे. मास्क (Mask) न घातल्याने मार्शलने संबधित व्यक्तीचा पुरावा म्हणून फोटो काढला. मात्र हा फोटा काढल्याने त्या बेशिस्त व्यक्तीने मार्शलला मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र ही घटना नेमकी कुठली आहे, याबाबत काही समजू शकलेलं नाही. (Controversy between citizen and clean up marshal over to taking photo in Mumbai, video goes viral on social media) 

नक्की काय झालं?  

या व्यक्तिच्या नाकाखाली मास्त होता. ही बाब क्लिनअप मार्शलच्या लक्षात आली. त्यामुळे त्याने पुरावा म्हणून फोटो काढला. तु फोटो का काढला, यावरुन  मार्शल आणि व्यक्तीमध्ये वाद झाला. वादाचं पर्यवसन हे मारहाणीत झालं. या व्यक्तीने मार्शलला मारहाण केली. या मारहाणीत मार्शलच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे मार्शलचं सिटी स्कॅन करण्यात आलंय. 

दरम्यान मार्शलना मारहाण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी डिसेंबर 2020 मध्ये भांडूपमध्ये क्लिन अप मार्शलना मारहाण करण्यात आली होती. मास्कची विचारणा केल्याने महिलेनेच महिला मार्शच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घातला होता.

सर्वसामांन्याचं म्हणंन काय? 

मास्क न घालणाऱ्यांना 250 रुपये दंड द्यावा लागतो. क्लिन अप मार्शल स्वच्छतेच्या नावाखाली सर्वसामांन्याची लूट करतात.  मार्शल हे एखाद्या कमजोर व्यक्तीला तसेच मुंबईत नवखे असलेल्यांना  जाणीवपूर्वक लक्ष करतात. त्यांच्याकडून पैसे उकळतात, असं काही मुंबईकराचं म्हणंन आहे. यामुळेच मार्शल आणि नागरिकांमध्ये वाद होतात.