काळवीट शिकार प्रकरणात सैफ, तब्बू, सोनालीसुद्धा होते सहभागी, मग बिश्नोईच्या टार्गेटवर सलमान खानच का? जाणून घ्या

Salman Khan : मुंबईत राष्ट्रवादीचे आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने घेतल्यानंतर आता या प्रकरणाचे संबंध सलमान खानशी जोडले जात आहेत. यानिमित्ताने 26 वर्षांपूर्वीचं काळवीट शिकार प्रकरण पुन्हा एकदा ताजं झालं आहे.   

राजीव कासले | Updated: Oct 17, 2024, 05:59 PM IST
काळवीट शिकार प्रकरणात सैफ, तब्बू, सोनालीसुद्धा होते सहभागी, मग बिश्नोईच्या टार्गेटवर सलमान खानच का? जाणून घ्या title=

Salman Khan : तब्बल 26 वर्षांपूर्वीचं एक प्रकरण अजूनही बॉलीवूडचा भाईजान अर्थान सलमान खानची (Salman Khan) पाठ सोडत नाहीए. या प्रकरणात सलमान खानला तुरुंगवासही झाला होता. पण या प्रकरणाशी संबंधित असलेल्या बिश्नोई गँगला (Bishnoi) सलमानला झालेली ही शिक्षा पुरेशी वाटत नाहीए. 1 ऑक्टोबर 1998 मध्ये झालेल्या काळवीट शिकारीत ( सलमान खान एकटा नव्हता. त्याच्याबरोबर अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे आणि तब्बू हे देखील होते. पण बिश्नोई गँगच्या निशाण्यावर सलमान खान आणि त्याच्या जवळची लोकं आहेत. 

5 नोव्हेंबर 1999 मध्ये 'हम साथ-साथ है' हा चित्रपट प्रदर्शित झाला. मल्टीस्टरार चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. पण या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान घडलेल्या एक घटनेने आज 26 वर्षांनंतर ही सलमान खानची पाठ सोडलेली नाही.

काळवीट शिकारीचा आरोप
1998 च्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात 'हम साथ-साथ है' चित्रपटाच्या शुटिंग निमित्ताने सर्व कलाकार राजस्थानमध्ये होते. यादरम्यान सलमान खान, सैफ आली खान, सोनाली बेंद्रे आणि तब्बू शिकारीसाठी गेले. जिथे सलमान खानने एका काळवीटाची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. सलमान खानवर गुन्हा दाखल करण्यात आला. जोधपूरच्या घोडा फार्म हाऊस आणि भवाद गावातील पोलीस स्थानकात सलमानविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. तर कांकाणी गावातील पोलीस स्थानकात दोन काळवीट आणि एका हरणाच्या शिकारीची तक्रार दाखल झाली. 

किती गुन्हे दाखल झाले?
काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानविरुद्ध एकूण चार गुन्हे दाकर करण्यात आले.  मथानिवा आणि भवादमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. कांकाणी पोलीस स्थानकात झालेल्या पोलीस तक्रारीच्या आधारे जोधपूर कोर्टाने सलमानला दोषी ठरवलं होतं. तर चौथा गुन्हा आर्म्स अॅक्ट अंतर्गत करण्यात आला. लायसन्स संपल्यानंतर .32 आणि .22 बोर रायफल ठेवलण्याचा ठपका सलमानवर ठेवण्यात आला. 

सलमानने शिकार केली
गोळीचा आवाज ऐकल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी सलमान खानच्या हातात रायफल होती असं जोधपूर कोर्टात प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं. तर जीपमधअये सैफ अली, नीलम, सोनाली आणि तब्बू होते. या चार जणांवर सलमानला शिकारीसाठी उसकवल्याचा आरोप करण्यात आला. ग्रामस्थांना पाहिल्यानंतर सलमान खान आणि इतर कलाकार मृत काळवीटाला तिथेच सोडून निघून गेले. पण हे प्रकरणी कोर्टात पोहोचलं. कोर्टात सलमान खानबरोबरच सैफ निलम, सोनाली आणि तब्बू यांची नावंही होती.

कोर्टात प्रत्यक्षदर्शीने साक्ष फिरवली
जोधपूर कोर्टात काळवीट शिकार प्रकरणाची सुनावणी सुरु असताना छोगाराम नावाच्या प्रत्यक्षदर्शीने आपली साक्ष फिरवली. आपल्याला काही आठवत नसल्याचं त्याने कोर्टाला सांगितलं. आपल्या या प्रकरणातून बाजूला करावं अशी विनंतीही त्याने कोर्टाकडे केली.

चार कलाकार ठरले निर्दोष
त्यामुळे सैफ अली खान, नीलम, सोनाली, तब्बू यांना कोर्टाने पुराव्याअभावीन निर्दोष मुक्त केलं. तर सलमान खानवर अनेक वर्ष केस सुरु होती. या प्रकरणात सलमान खानला तुरुंगाची हवाही खावी लागली. तेव्हापासून बिश्नोई समाजाचा सलमान खानवर संताप आहे. बिश्नोई समाजात हरणाची पूजा केली जाते.