Miraj Bandh News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांचे बंधू आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी काल मिरजमध्ये केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे. ( Maharashtra Political News ) या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, मिरजेतल्या तहसीलदारांनी दोन्ही बाजूंना परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिलेत. (Miraj Bandh) पाडकाम झालेल्या ठिकाणी समर्थक आणि विरोधकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Maharashtra News in Marathi)
ब्रह्मानंद पडळकर यांच्या दबावाखाली प्रशासन एकतर्फी कारवाई करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. मिरजेतली घरं, दुकानं पाडली जात असताना प्रशासन किंवा सरकारमधील कोणीही फिरकलं नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासन एकतर्फी नोटीस काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Miraj : मध्यरात्री दुकान आणि हॉटेल जेसीबीच्या सहाय्याने पाडलीत
ब्रह्मानंद पडळकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री काही दुकानं आणि हॉटेलं पाडली. त्याचा निषेध म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट, एमआयएम, आरपीआयसह विविध सामाजिक संघटनांनी बंदचं आवाहन केलं आहे. दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भावाची पाठराखण करत सर्व आरोप फेटाळून लावले. ब्रह्मानंद पडळकर यांच्या प्लॉटवर झालेलं अतिक्रमण काढून घ्यावं, महापालिकेनेच सांगितल्याचा दावा आमदार पडळकर यांनी केला आहे.
दुकाने पाडल्यानंतर मोठा जमाव जमला होता. त्यामुळे येथे रात्री तणावाची परिस्थिती होती. झोपड्या घरे पाडल्यानंतर परिस्थिती चिघळली आहे. हा प्रकार घडत असताना पोलीसांना माहिती मिळाली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे, ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह सुमारे 200 पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीसांनी चारही जेसीबी जप्त केलेत.
हा सगळा प्रकार सत्तेच्या जोरावर करण्यात आला आहे. ही घरे पाडली जात असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. यामुळे उपअधिकक्षक आणि निरीक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांना अटक करण्यात यावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.