नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरमधल्या रेशीमबागेतल्या स्मृती मंदिर परिसरात 'इफ्तार पार्टी'ची परवानगी नाकारण्यात आलीय. राष्ट्रीय मुस्लिम मंचानं संघाच्या स्मृती मंदिर परिसरात इफ्तार पार्टीची परवानगी मागितली होती. संघाच्या स्मृती मंदिर परिसरात इफ्तार पार्टीचे आयोजन केल्यास सामाजिक समरसतेचा संदेश जाईल, अशी त्यामागची भूमिका होती. मात्र ही परवानगी नाकारण्यात आलीय.
परवानगी नाकारण्यासाठी संघाचा तृतीय वर्ष वर्ग सुरू असल्याचं कारण देण्यात आलंय. 'मुस्लिम राष्ट्रीय मंच' ही संघ प्रेरित संघटना आहे. याबद्दल संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.