मुंबई : मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये गारपिट आणि जोरदार पाऊस झाल्यानंतर आता पुढचे ४८ तास विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी तसंच नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
रविवारी वादळी वा-यांसह अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतक-यांना त़डाखा दिला होता. यामुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं होतं. आता सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशीही वादळी वा-यांसह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तेव्हा शेतक-यांनी सावध राहिले पाहिजे.
पिकांची कापणी करुन शेतमालाची योग्यरित्या साठवणूक करणे आवश्यक आहे. विशेषत: वादळी वारे वाहत असतांना नागरिकांनीही सुरक्षित ठिकाणी थांबणे आवश्यक आहे. कारण रविवारी वीज पडून मृत्युमुखी पडण्याच्या घटनाही घडल्या होत्या.