होरपळ! आठवड्याच्या शेवटी उन्हाचीच बॅटिंग; सुट्ट्यांच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा विचारही नकोच

Maharashtra Weather : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार असून, मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, राज्याच्या 'या' भागांमध्ये मात्र अवकाळी पावसानं नाकीनऊ आणले आहेत.   

सायली पाटील | Updated: Apr 26, 2024, 06:55 AM IST
होरपळ! आठवड्याच्या शेवटी उन्हाचीच बॅटिंग; सुट्ट्यांच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा विचारही नकोच  title=
Maharashtra Weather news heatwave alert in Mumbai and vidarbha to experiance hailstorm latest update

Maharashtra Weather News : राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अकाळी पावसाचा मारा केल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर, काही ठिकाणी शेतपिकं आणि फळबागांचंही नुकसान झालं आहे. एकिकडे अवकाळी संकटं वाढत असतानाच दुसरीकडे मात्र गारपीटीचाही मारा सुरुच आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील किमान पाच दिवसांसाठी राज्यातील हवामानाची हीच स्थिती पाहायला मिळणार असून, त्यात फारसे बदल अपेक्षित नाहीत. त्यामुळं आठवड्याचा शेवट पाहता सुट्ट्यांच्या दिवशी घराबाहेर पडण्य़ाच्या विचारात असाल तर आधी हवामानाचा अंदाज पाहण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. 

मुंबईत उष्णतेची लाट 

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईसह उपनगरांत तापमानात घट नोंदवण्यात आली असली तरीही आर्द्रतेमुळं मात्र उकाडा जाणवत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमान 33 ते 37 अंशांच्या घरात राहणार असून, त्यामुळं जाणवणारा दाह अधिक असणार आहे. उन्हाचे चटके कमी झाले असले तरीही शहरातील नागगिरांना उष्णा दुपटीनं जाणवत असल्यानं अडचणी वाढल्या आहेत. 

हेसुद्धा वाचा : नाशिकच्या जागेवरुन महायुतीत नवा ट्विस्ट, प्रीतम मुंडे यांना उमेदवारी?

 

पुढील 48 तासांसाठी रत्नागिरी, रायगड आणि पालघर भागांमध्ये उष्णतेची ही लाट अधिक तीव्र होणार असून, त्याचा परिणाम मुंबईतील किनारपट्टी क्षेत्रांमध्ये अधिक दिसून येणार आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रांमध्ये हवामान उष्ण आणि दमट राहणार असून, काही भागांमध्ये मुंबईप्रमाणंच उष्णतेची लाट येणार आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच रायगडमध्ये अवकाळीनं डोकं वर काढलं असून, पुढील 24 तासांमध्ये इथं वातावरण ढगाळ राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, एकिकडे देशाच्या आर्थिक राजधानीत ही स्थिती असताना राज्यात सर्वाधिक तापमानाचा आकडा 42 अंशांच्या पलिकडे जाईल, तर किमान तापमान 33 ते 29 अंशांदरम्यान असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.