भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मधुकर कुकडे यांना उमेदवारी

राष्ट्रवादीने जाहीर केली उमेदवारी

Updated: May 9, 2018, 08:15 PM IST
भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मधुकर कुकडे यांना उमेदवारी title=

गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी आमदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मधुकर कुकडे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आरपीआय आणि पिरिपाचं कुकडे यांना समर्थन आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचं नाव देखील चर्चेत होतं. पण भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक लढवायला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, तसंच त्यांच्या घरातलं इतर कोणीही इच्छूक नव्हतं. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या पोटनिवडणुकीसाठी विजय शिवणकर, नाना पंचबुद्धे आणि माजी आमदार मधुकर कुकडे, या ३ जणांची नावं राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी चर्चेत होती. 

भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक येत्या २८ मेला होणार असून भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत पटले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याआधी भाजप तर्फे शक्ती प्रदर्शन करत हजारोंचा संख्येने कार्यकर्त्यांसह शहरात भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी रॅलीमध्ये भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते. लोकसभा पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने भाजपाचे उमेदवार जिंकून येईल असा विश्वास भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.