लोकसभा निवडणूक २०१९ : धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक

२३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

Updated: Mar 28, 2019, 07:03 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक title=

धुळे : या मतदारसंघात वंचित आघाडीमुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. युती झाल्यामुळे भाजपला फायदा होऊ शकतो. भाजपकडून सध्याचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसने कुणाल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे भाजपला फटका बसू शकतो. अनिल गोटे हे भाजपचा प्रचार करणार नाहीत. २३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

२०१४ चा निकाल

धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुभाष भामरे यांनी काँग्रेसच्या अमरिष पटेल यांचा ४,७२,५८१ मतांनी पराभव केला होता. याआधी २००९ च्या निवडणुकीत भाजपच्या प्रताप सोनवणे यांचा विजय झाला होता.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

 

उमेदवार

 पक्ष

 मतदान

सुभाष भामरे भाजप 529450
अमरिष पटेल काँग्रेस 398727
ईशी योगेश यशवंत बसपा 9897
अन्सारी निहाल आप 9339
रमेश मोरे अपक्ष 8057