सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : एका क्षणात शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे (Maharashtra Farmer). डोळ्यादेखत पीक नष्ट झाले आहे. नांदेड जिल्ह्यात (Nanded News) कीटकनाशक फवारणी (fertilizer) केल्यामुळे तब्बल 200 एकरवरील हरभरा पीक उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांनी चक्र किटकनाशकाची फवारणी केल्यानंतर पीकांचे नुकसान जाले. यानंतर कीटकनाशकावर बंदी घालण्यात आल्याचे समजते. कीटकनाशक फवारणी केल्यामुळे तब्बल 200 एकरवरील हरभरा पिक उध्वस्त झाल्याचा प्रकार नांदेड जिल्ह्यात घडला आहे. कृषी विभागाने पिकांचा पंचनामा करून कीटकनाशक विक्रीवर बंदी घातली आहे.
बिलोली तालुक्यातील बाभळी येथील शेतकऱ्यांनी हरभरा पिकावर चक्र नावाच्या किटकनाशकाची फवारणी केली होती. बाभळीतील अनेक शेतकऱ्यांनी याच कीटकनाशकाची फवारणी केली. पण फवारणी नंतर काही दिवसांनी फुल व फळ गळून पानेही गळू लागली. जवळपास 200 एकरवरील हरभरा पिकाचे नुकसान या फवारणीमुळे झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर शेतात जाऊन अधिकाऱ्यांनी पंचनामा केला.
चक्र नावाच्या कीटकनाशक विक्रीवर कृषी विभागाने बंदी घातली आहे. फवारणी केलेल्या औषधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.
हिंगोलीच्या सेनगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीचं कार्यालय फोडल आहे. आयसीआयसीआय लोम्बार्डच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांनी खुर्च्या, टेबल आणि इतर साहित्याची तोडफोड केली. पीक विम्याचा लाभ मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले होते. अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना अजून मदत मिळालेली नाही. याबाबत अर्जविनंत्या करूनही विम्याची रक्कम पदरात न पडल्यानं शेतकरी आक्रमक झाले.