रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं. सर्वाधिक फटका उत्तर रायगडला बसलाय. कर्जत, खोपोली, खालापूर ,पनवेल,पेण आणि पाली या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर होता. 

Updated: Jul 23, 2017, 03:55 PM IST
रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले title=

रायगड : रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं. सर्वाधिक फटका उत्तर रायगडला बसलाय. कर्जत, खोपोली, खालापूर ,पनवेल,पेण आणि पाली या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर होता. 

पाताळगंगा नदी, आंबा,बाळगंगा, उल्हास आणि पेज या नद्यांना पूर आलाय. सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. कर्जत आशाना धबधब्यावर मुंबईतील दोन पर्यटक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये वडील आणि मुलीचा समावेश आहे. त्यामुळे कर्जमधील सर्वच धबधब्यांवर पर्यटकांना बंदी केलीय. मात्र, या बंदीचं उल्लंघन होताना सर्रास दिसून येतंय. 

पोलीस यंत्रणेला पर्यटक जुमानत नसल्याचं समोर आलंय. तर मुसळधार पावसानं गोठा कोसळल्याची घटनाही घडली होती. तसंच  तीन म्हशी मृत्युमुखी पडल्या. त्याचप्रमाणे सखल भागात पाणीही साचल्याच्या घटना घडल्यात.