मुंबई : बोगद्यात दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या २४ तासात अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका हा कोकण रेल्वेला बसला आहे. मुसळधार पावसाने दरड कोसळली आहे. पेडणे बोगद्यातील संरक्षक भिंत कोसळल्याने मातीचा ढिगारा रेल्वे रुळावर आला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला आहे. कोकण रेल्वेची ठप्प झालेली वाहतूक पनवेल-पुणे-मिरज- लोंडा- मडगाव मार्गे आणि मडगाव-लोंडा-मिरज-पुणे-पनवेल-कल्याण मार्गे वळविण्यात आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळली, बोगद्यात दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प । गोवा येथील पेडणे बोगद्यात दरड कोसळली । काही एक्स्प्रेस गाड्या मडगाव-लोंडा-मिरज-पुणे- पनवेल- कल्याण मार्गे पुढे वळविण्यात आल्यात तर काही पनवेल-पुणे-लोंडा-मडगाव मार्गे. @ashish_jadhao @KonkanRailway pic.twitter.com/zCzc6rbHZP
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 6, 2020
मुसळधार पाऊस आणि कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. गोवा येथील पेडणे बोगद्यात दरड कोसळली असून काही एक्स्प्रेस गाड्या मडगाव-लोंडा-मिरज-पुणे- पनवेल- कल्याण मार्गे पुढे काढण्यात आला आहेत. तर काही पनवेल-पुणे-लोंडा-मडगाव मार्गे अशी वळविण्यात आल्या आहेत.
Diversion of Trains on Konkan Railway route due to heavy rain in last 24 hours & collapsing of tunnel lined wall inside Pernem tunnel between Madure & Pernem station. @RailMinIndia @Central_Railway @WesternRly @GMSRailway @SWRRLY pic.twitter.com/LSbgK4rTmr
— Konkan Railway Corp (@KonkanRailway) August 6, 2020
एर्नाकुलम निजामुद्दीम सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस, थिरुवंतनपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक स्पेशल एक्स्प्रेस, राजधानी स्पेशल एक्स्प्रेस, निजामुद्दीम एर्नाकुलम एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक थिरुवंतनपुरम सेंट्रल एक्स्प्रेस या गाड्यां दुसऱ्यामार्गे वळविण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.