Shirdi : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देत भक्तांची दु:ख हरणाऱ्या आणि त्यांना सन्मार्गावर नेणाऱ्या साईबाबांच्या (Saibaba) चरणी नतमस्तक होण्यासाठी असंख्य भाविक गर्दी करताना दिसतात. पहाटेची काकड आरती असो किंवा मग साधं मुखदर्शन असो, साईंचरणी आपली सेवा पोहोचवण्यासाठी भक्त सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं. अशाच या साईंच्या शिर्डीमध्ये दिवाळीच्या दिवसांदरम्यान लक्षवेधी घटना घडल्याचं पाहायला मिळालं. (Devotees offers more than 18 crores wealth to shirdi saibaba mandir)
(Shirdi Saibaba holidays) दिवाळीच्या सुट्टीनिमित्तानं लाखोंच्या संख्येनं भावित साईंच्या शिर्डीत दाखल झाले होते. इथं सेवा देण्यासाठी म्हणून भक्तांनी दानपेटीमध्ये आपआपल्या परिनं दान केलं. 15 दिवसांमध्ये दानाच्या रकमेचा हा आकडा 18 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.
भक्तांनी काय काय दान केलं?
बाबांच्या चरणी भक्तांनी केलेल्या दानामध्ये जवळपास 29 देशांमधील 24 लाख 80 हजार रुपयांच्या परकीय चलनाचा समावेश आहे. तर, तब्बल 39 लाखांहून अधिक किमतीचं 860.450 ग्रॅम सोनं आणि 5 लाखांहून अधिक किमतीची 13345 ग्रॅम चांदी आहे.
शिर्डीत परदेशी भाविकांपासून सेलिब्रिटींची गर्दी (Shirdi Saibaba darshan)
शिर्डी आणि साईबाबांची महती जसजशी जनमानसात पसरत आहे, तसतशी इथं येणाऱ्या भक्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गावोगावीच्या देशोदेशीच्या भाविकांपासून यामध्ये सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेमंडळींचाही समावेश आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्राथमिक सोईसुविधा देण्यासाठी शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानकडूनही बरेच प्रयत्न केले जाताना दिसतात. यामध्ये प्रसादालय, साईभक्त निवास, साई सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.
डेबिट कार्ड- 1 कोटी 84 लाख 22 हजार 426 रुपये
दक्षिणा पेटी - 3 कोटी 11 लाख 79 हजार 184 रुपये
देणगी काऊंटर - 7 कोटी 54 लाख 45 हजार 408 रुपये
ऑनलाईन देणगी- 1 कोटी 45 लाख 42 हजार 808 रुपये
डीडी/ चेक - 3 कोटी 3 लाख 55 हजार 946 रुपये
मनीऑर्डर- 7 लाख 28 हजार 833 रुपये