प्रदूषित पाणी सोडल्याने मृत माशांचा खच

 भिले आणि केतकी येथे मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडला आहे.

Updated: Jul 1, 2019, 04:02 PM IST
प्रदूषित पाणी सोडल्याने मृत माशांचा खच  title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : मुसळधार पाऊस पाहून लोटे येथील कंपन्यानी प्रदूषित पाणी सोडल्याने भिले आणि केतकी येथे मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडला आहे. सध्या मोठ्या प्रमाणात माशांच्या वेगवेगळ्या जाती बऱ्याच वर्षांनी करंबवणे खाडीत आलेल्या होत्या. त्यामुळे मुबलक प्रमाणात मासे मिळत असून सर्व मच्छिमार आनंदात आहेत.

पण आज मोठ्या प्रमाणात मासे मृत पावल्याने लोकांसमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे.शासनाने वेळीच दखल घेऊन प्रदूषण थांबवावे अशी मागणी भिले येथील ग्रामस्थ आणि दाभोळ खाडी संघर्ष समिती करत आहे. काही दिवसांपूर्वी असेच प्रदूषित पाणी सोडल्याने तुंबाड येथे मृत मासे आढळले होते. आता पुन्हा प्रदूषित पाणी खाडीत सोडल्याने लोटे एमआयडीसीवर कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.