Santosh Bangar: संतोष बांगर... शिंदे गटातील सर्वात वादग्रस्त आमादार. काधी वादग्रस्त वक्तव्यामुळे तर कधी वादग्रस्त कृतीमुळे संतोष बांगर नेहमीच चर्चेत असतात. हेच वादग्रस्त वर्तन आता संतोष बांगर यांच्या अंगाशी आले आहे. संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कावड यात्रेत तलवार नाचवल्याप्रकरणी संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कावड यात्रेत तलवार फिरवून दहशत माजवल्याप्रकरणी संतोष बांगर यांच्याविरोधात कळमनुरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये हा गुन्हा दाखल झाला आहे. कळमनुरी येथील पोलीस कॉन्स्टेबल सतीश शेळके यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी हिंगोलीच्या कळमनुरी येथील चिंचाळेश्वर मंदिरातून हिंगोली येथील महादेव मंदिरापर्यंत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली होती. या कावड यात्रेत त्यांनी बेकायदा पद्धतीने तलवार फिरवून कावड यात्रेतील भाविकांना दाखवली होती. याचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना आता मुख्यमंत्रीपदाची भुरळ पडलीय अशी चर्चा रंगलीय. कारण मुख्यमंत्री झालो तर पोलिसांना भगव्या टोप्या घालू असं विधान बांगरांनी केलंय.. कावड यात्रेदरम्यान बांगरांनी ते विधान केले. बांगरांच्या या विधानावर
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी त्यांना टोला लगावला आहे.
दरम्यान, पोलीस खात्याच्या ड्रेस मध्ये एक आमदार किंवा एकटा मुख्यमंत्री बदल करू शकत नाही. त्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी घ्यावी लागते, याची आठवण माजी सहायक पोलीस उपआयुक्त नागनाथ कोडे यांनी करून दिलीय.
आम्ही इंडिया आहोत तर तुम्ही घमेंडिया आहेत. NDAची अवस्था अमिबासारखी झालीय अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केलीय. गद्दारांची नाग समजून पूजा केली मात्र पूजा केल्यानंतर गद्दार डसले असं म्हणत त्यांनी आमदार संतोष बांगर यांचाही समाचार घेतला. हिंगोलीत उद्धव ठाकरेंची सभा झाली यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही हल्लाबोल केला होता.