Malpua Recipe: साखरेच्या पाक न वापरता गूळ घालून बनवा चविष्ट मालपुआ, जाणून घ्या रेसिपी

Gud Malpua Recipe: गूळ आणि रव्यापासून चविष्ट मालपुआ बनवून खाऊ शकता. हे मालपुआ खायला इतके चविष्ट असतात की एक-दोन खाऊनही तृप्त होणार नाही.

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 12, 2024, 04:15 PM IST
Malpua Recipe: साखरेच्या पाक न वापरता गूळ घालून बनवा चविष्ट मालपुआ, जाणून घ्या रेसिपी title=
Photo Credit: Freepik

Easy Indian Sweet Recipe: रोजचीच भाजी आणि भाकरी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी काही तरी नवीन पदार्थाचा शोध घेतला जातो. सणासुदीचे दिवस सुरु आहेत. या दिवसात आवर्जून गोड पदार्थ बनवले जातात. तुम्ही घरीच मालपुआ बनवू शकता. गूळ आणि रवा घालून खूप मालपुआ बनवू शकता.  विशेष म्हणजे मालपुआ बनवण्यासाठी तुम्हाला साखरेची  गरज भासणार नाही. तुम्ही गुळाचा वापर करू शकता. लहान मुले ते मोठे सगळ्यांचं हा मालपुआ आवडेल. हे मालपुआ तोंडात ठेवताच विरघळतील. चला जाणून घेऊया गुळाचा मालपुआ बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात. 

लागणारे साहित्य 

गूळ
अर्धा कप रवा
1 कप मैदा
1 टेबलस्पून खोबरे
अर्धा टीस्पून बडीशेपची पावडर 
तेल

जाणून घ्या रेसिपी 

> गुळाचा मालपुआ तयार करण्यासाठी एका भांड्यात गूळ भिजवा. लक्षात घ्या गुळात जास्त पाणी घालू नये. फक्त गूळ बुडेल एवढंच  पुरेसे पाणी घाला. आता एका भांड्यात 1 कप मैदा आणि अर्धा कप रवा घ्या. आता गुळ पाण्यात भिजल्यावर त्याला गाळून घ्या. यानंतर त्यात झाल्यावर मैदा आणि रवा मिसळा.

> लक्षात घ्या तुम्हाला एक गुळगुळीत आणि सहज पडेल असे पीठ बनायचे आहे. हे पोट आपण बेसनाचा पोळा बनवतो त्यापेक्षा जरा जास्त जाड पीठ असेल.  पिठात पातळ करण्यासाठी पाण्याऐवजी दूध वापरा. 

> आता त्यात अर्धा टीस्पून वेलची, 1 टेबलस्पून खोबरे आणि अर्धा टीस्पून बडीशेपची पावडर घाला.

> पीठ तयार झाल्यावर, 5-10 मिनिटे ठेवा. यानंतर कढईमध्ये तेल गरम करा. आता एक मोठी वाटी घेऊन त्यात पिठात भरून तव्याच्या मध्यभागी ओता. गॅसची आच मध्यम ठेवा. मालपुआ तेलात टाकताच पसरायला सुरुवात होईल.

> आता मालपुआ थोडा वेळ शिजू द्या. एक बाजू हलकीशी शिजली की मालपुआ चिमट्याने पकडून वळवा. मालपुआ दोन्ही बाजूंनी शिजल्यावर दाबून बाहेर काढा. त्याचप्रमाणे सर्व मालपुआ तयार करायचे आहेत.

> हे मालपुआ गरम किंवा थोडे थंड झाल्यावर खावेत. हा मालपुआ तुम्ही २-३ दिवस सहज खाऊ शकता.