मुंबई : जंगल हे सगळ्या प्रकारच्या प्राण्यांचं घर आहे. येथे तुम्हाला मांसाहारी प्राण्यापासून ते शाकाहारी प्राणी देखील पाहायला मिळताता. जंगलाचा हा नियम आहे की, एका प्राण्याला जगण्यासाठी दुसऱ्या एका प्राण्याचा जीव घ्यावाच लागणार. या सगळ्यात बहुतांश शिकार होते ती, हरिण, म्हैस आणि झेब्राची. सिंह, वाघ यांसारथे भक्षक प्राणी याच प्राण्यांचा शिकार करतात. कारण यांची शिकार करणं तसं सोपं जातं.
आपल्याला सोशल मीडियावर जंगलातील किंवा वाईल्ड लाईफ संबंधीत अनेक व्हिडीओ पाहायला मिळेले असतील. ज्याती काही व्हिडीओ पाहून आपल्याला आनंद होतो. तर काही व्हिडीओ आपल्या अंगावर काटा आणतात.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो एका शिकारीचा व्हिडीओ आहे.
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका तलावाकाठी अनेक झेब्रा पाणी पिण्यासाठी आले आहेत. परंतु त्यांना हा विचार येत नाही की, पाण्यात देखील त्यांच्या जिवाला धोका आहे. ते आपलं मनोसंक्त पाणी पित असतात. परंतु तेवढ्यात एक मगर बाहेर येते आणि ती एका झेब्राचा पाय आपल्या तोंडा घट्ट धरुन ठेवते.
हा झेब्रा आपलं संपूर्ण बळ लावून आपला पाय या मगरीच्या तोंडातून सोडवण्याचा प्रयत्न करतो. परंतु तो असफल ठरतो. हा व्हिडीओ इथेच संपतो, ज्यामुळे या झेब्राचे प्राण वाचले की, त्याला आपला पाय गमवावा लागला हे काही कळलेलं नाही.
हा व्हिडीओ wildmaofficial नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ युजर्सना फारच आवडा आहे. या व्हिडीओची सर्वत्र एकच चर्चा होत आहे.