मुंबई : तुम्ही विमान प्रवास करत असाल किंवा तुमचा प्रवासाचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. विदेशात जाण्यासाठी पासपोर्ट हा गरजेचाच असतो आणि या पासपोर्टसाठी मात्र एका मोठ्या प्रक्रियेतून जावं लागतं. भारत सरकारने पासपोर्टमध्ये मोठे बदल केले असल्याचं बोललं जातयं.
पासपोर्ट हासिल करने में अभी भी काफी मशक्कत करनी पड़ती है. आपको ऑनलाइन आवेदन करना है, अपनी जानकारी को सत्यापित करना है और फिर पुलिस सत्यापन के बाद ही आपको पासपोर्ट मिलता है. पासपोर्ट विदेश मंत्रालय द्वारा जारी किया जाता है. इस बीच सोशल मीडिया पर एक मैसेज वायरल हो रहा है कि सरकार ने पासपोर्ट में बदलाव किया है. इसमें यह भी कहा जा रहा है कि अब लोगों को अपने पासपोर्ट में बदलाव करवाना होगा.
पासपोर्ट मिळवण्यासाठी आजही मोठ्या प्रक्रियेतून जावं लागतं. तुम्हाला सर्वात आधी ऑनलाईन अर्ज करावा लागतो, तुमच्या माहितीची सत्यता पडताळली जाते, त्यानंतर पोलिसांनी सत्याता जाणून घेतल्यानंतर तुम्हाला पासपोर्ट मिळतो. पासपोर्ट हा परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत दिला जातो. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होतोय ज्यामध्ये असं सांगितलं आहे की सरकारने पासपोर्टमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यात असं देखील म्हटलं आहे की तुम्हाला तुमच्या पासपोर्टमध्ये बदल करावे लागणार आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या दाव्या बद्दल पीआयबीने (PIB) फॅक्ट चेक केली आहे. पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन अशी माहिती दिली आहे की, व्हाट्सअपच्या माध्यमातून जो मेसेज व्हायरल होतोय त्यात भारत सरकारने पासपोर्टमधून राष्ट्रीयतेचा कॉलम काढून टाकला आहे. हा दावा पुर्णपणे खोटा आहे. भारत सरकारने पासपोर्ट संबंधीत असा कोणताही आदेश काढला नाही म्हणून तुम्ही संभ्रमात पडू नका.
हा दावा पुर्णपणे खोटा आहे. भारत सरकारने पासपोर्टमध्ये मोठे बदल करण्याच्या आदेश काढले नाहीत. व्हायरल मेसेजमध्ये करण्यात येणाऱ्या दाव्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की, तुम्हाला जुना पासपोर्ट दिल्यानंतरच नवा पासपोर्ट मिळणार आहे. हा दावा खोटा आहे. त्यासोबतच, पीआयबीने असा सल्ला दिला आहे की कोणत्याही व्हायरल मेसेजची सत्यता तपासण्यासाठी जास्तीत जास्त वेबसाइटला भेट देऊन त्या मेसेजला क्रॉस व्हेरिफाय करा.