Viral Diwali video: चक्क तोंडाने पेटवले 11 रॉकेट..काकांचा swag च लय भारी !

एक आतिषबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे . 2 वर्षांनी सर्व दिवाळी साजरी करत आहोत कोरोनामुळे गेली 2 वर्ष दिवाळी सण साजरा होऊ शकला नव्हता..

Updated: Oct 25, 2022, 08:07 PM IST
Viral Diwali video: चक्क तोंडाने पेटवले 11 रॉकेट..काकांचा swag च लय भारी ! title=

VIRAL TRENDING VIDEO : सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे कि तिथे काही व्हिडीओ, फोटो टाका जर ते छान असतील तर वाऱ्यासारखे जगभरात पसरतात आणि लाखो-करोडो लोक ते पाहतात. काही लोक तर सोशल मीडियाच्या माध्यमातून इतके प्रसिद्ध झाले कि, आज ते सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीयेत. 

अनेक व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर (social media viral post ) पोस्ट होत असतात लाखो लोक हे व्हिडीओ पाहतात लाईक्स करतात अआवड्ल्यास कंमेंट आणि शेअर सुद्धा केले जातात. ,असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलंय आणि या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.  (viral diwali video uncle released 11 rockets in 20 seconds mouth cigaret interesting )

सध्या दिवाळी आहे सगळीकडे फटाक्यांची आतिषबाजी चालू  असते. असाच एक आतिषबाजीचा व्हिडीओ  (diwali viral video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे . 2 वर्षांनी सर्व दिवाळी साजरी करत आहोत कोरोनामुळे गेली 2 वर्ष दिवाळी सण साजरा होऊ शकला न्हवता त्यामुळे यावर्षी सर्वानी याची  कसर भरून काढली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असं काही करात आहे कि सर्व जण अवाक झाले आहेत . 

आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो  त्या व्यक्तीने काही सेकंदात त्याच्या ओठांमध्ये असलेल्या सिगारेटचा वापर करून अनेक रॉकेट सोडले. त्यात असे दिसून आले की, रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या माणसाने 20 सेकंदात सुमारे 11 रॉकेट सोडले. जखमी होण्याची किंवा भाजण्याची भीती न बाळगता त्यांनी हे धाडसी कृत्य केले. सोशल मीडियावर सध्या या काकांची आणि त्यांच्या धाडसाची चांगलीच चर्चा आहे.  (viral diwali video uncle released 11 rockets in 20 seconds mouth cigaret interesting )