मुंबई : भैय्यू महाराजांचं पार्थिव इंदूरमधल्या सूर्योदय आश्रमात आणण्यात आलंय. दीडच्या सुमाराला त्यांची अंत्ययात्रा निघेल. सयाजी चौकातल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भय्यू महाराजांच्या पार्थिवावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भैय्यू महाराजांनी मंगळवारी दुपारी पिस्तुलानं स्वत:च्या मस्तकात गोळी झाडून आत्महत्या केली. काल रात्रभर त्यांचं पार्थिव इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं.
भैय्यू महाराजांचे राजकीय संबंध बघता अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ती इंदूरमध्ये येण्याची शक्यता आहे. भैय्यू महाराजांचे सर्वपक्षीयांची अगदी जवळचे संबंध होते.
आध्यात्मिक गुरु म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भैय्यू महाराजांवर आज इंदोरमध्ये अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत. भैय्यू महाराजांनी काल दुपारी आपल्या परवाना असणाऱ्या पिस्तुलानं स्वत:च्या मस्तकात गोळी झाडून आत्महत्या केली. काल रात्र भर त्यांचं पार्थिव इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आलंय. आज सकाळी त्यांचे पार्थिव इंदूरमधल्याच त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल. सकाळी १० वाजताच्या सुमारास भैय्यू महाराजांना त्यांच्या सूर्योदय आश्रमात आणण्यात येईल. इथे त्यांच्या अंत्य दर्शनाची सोय करण्यात आली आहे. साधारण दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघेल. इथून जवळ असणाऱ्या सयाजी चौकातील स्माशनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भैय्यू महाराजांचे राजकीय संबंध बघता अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ती इंदोरमध्ये येण्याची शक्यता आहे. भैय्यू महाराजांचे सर्वपक्षीयांची अगदी जवळचे संबंध होते. पण आज त्यांच्या अंत्यविधीला कोण कोण उपस्थित राहणार याबद्दल पोलीस प्रशासनानं आतापर्यंत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. पोलीस सूत्रांनी शहरात अतिमहात्वाच्या व्यक्तींच्या भेटीच्या वेळी लागणाऱ्या सुरक्षा यंत्रणा अद्याप तरी सक्रिय केलेल्या नाहीत. दुपारी दीडच्या सुमारास अंत्यविधीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्याआधी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या अनेक भागातून त्यांच्यां भाविकांनी काल रात्रीच सूर्योदय आश्रम आणि परिसरात यायला सुरुवात केली आहे.