नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात शिक्षा झालेल्या राम रहीमची हनीप्रीत फरार झाली आहे. याच हनीप्रीतची माहिती देणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
हनीप्रीतचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. हनीला पकडण्यासाठी विविध ठिकाणी छापेही टाकण्यात आले आहेत. मात्र, अद्याप हनी हाती लागलेली नाहीये. त्यामुळेच आता एका सामाजिक कार्यकर्त्याने हनीप्रीतची माहिती देणाऱ्या व्यक्तीस बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने ही बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. फकीरे लाल भोजवाल यांनी हनीची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये रोकड देण्याची घोषणा केली आहे. अनेक ठिकाणी हनीप्रीतचे पोस्टर्सही लावण्यात आले आहेत.
समाजसेवक असलेल्या भोजवाल याने म्हटलं की, समाजात असे अनेक बाबा आहेत जे लोकांच्या भावनांसोबत खेळत आहेत. अशा बाबांना पकडून पोलिसांच्या स्वाधिन केलं पाहीजे. यामुळेच हनीप्रीतची माहिती देणाऱ्या व्यक्तीला मी स्वत: एक लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं घोषित केलं आहे.