'भूतिया हवेली' म्हणून प्रसिद्ध आहे 'हे' हॉटेल, काय आहे यामागील नेमकं रहस्य?

या हॉटेलमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मताप्रमाणे, हे ठिकाण झपाटलेलं आहे.

Updated: Aug 6, 2022, 02:20 PM IST
'भूतिया हवेली' म्हणून प्रसिद्ध आहे 'हे' हॉटेल, काय आहे यामागील नेमकं रहस्य? title=

मुंबई : भारतात अशी अनेक रहस्यमयी ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी कोणीही जाण्यापूर्वी 100 वेळा विचार करतात. ही ठिकाणं त्यांच्या विचित्र घटनांसाठी देशात आणि जगात खूप लोकप्रिय आहेत. आज आपण ब्रिज भवनबद्दल बोलणार आहोत. हे राजस्थानच्या कोटा शहरात आहे. ही ब्रिटिशकालीन हवेली होती, तिचं आता हॉटेलमध्ये रूपांतर झालंय. आज त्याचं नाव राजस्थानच्या प्रसिद्ध हॉटेल्समध्ये गणलं जातं. 

जगभरातून अनेक लोक इथे येतात आणि राहतात. या हॉटेलमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मताप्रमाणे, हे ठिकाण झपाटलेलं आहे. हॉटेलमध्ये मुक्काम केलेल्या अनेक पर्यटकांनी अनेकदा आवाज ऐकला किंवा काही आत्म्याशी संबंधित घटना पाहिल्या असल्याचं सांगितलंय. ब्रिजभवन हॉटेलमध्ये एका इंग्रजाचा आत्माही राहतो, असं म्हटलं जातं. या इंग्रजाची अनेक वर्षांपूर्वी त्याच ठिकाणी त्याच्या दोन मुलांसह हत्या झाली होती.

ब्रिजभवनला एक गूढ इतिहास आहे, जे जाणून घेतल्याने तुमच्याही अंगावर काटा येऊ शकतो. 1857 च्या सुमारास चंबळ नदीजवळ पुलाची इमारत बांधण्यात आली. त्या काळात हिंदू-मुस्लिम यांच्यात खूप वाद व्हायचे. बंड सुरू झाले तेव्हा मेजर चार्ल्स बर्टन आणि त्यांची दोन जुळी मुले ब्रिजभवनमध्ये राहत होती, असं म्हटलं जातं. 

बंडाच्या वेळी सैनिकांनी या इमारतीला चारही बाजूंनी वेढा घातला आणि आत घुसून मेजर चार्ल्स बर्टन आणि त्यांच्या मुलांवर वार केले. तेव्हापासून या इमारतीत मेजरचा आत्मा वावरत असल्याचं सांगितले जातं. त्याच्या आत्म्याला अजून शांती मिळालेली नाही, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. 

कोटाच्या माजी राणीनेही आपल्या ड्रॉईंग रूममध्ये मेजर चार्ल्स बर्टनचे भूत अनेकदा पाहिल्याचा दावा केला होता. राणीच्या म्हणण्यानुसार, मेजरच्या आत्म्याने तिला कधीही इजा करण्याचा प्रयत्न केला नाही. ब्रिज भवन आता कोटा स्टेट गेस्ट हाउस बनलंय.

या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या मते, हॉटेलच्या गॅलरीत अनेकदा कोणीतरी चालल्याचा आवाज येतो. रात्रीच्या वेळी जर कोणी रूफटॉप गार्डनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर मेजरचं भूत त्याला मारतं. मात्र, कर्मचाऱ्यांच्या या वक्तव्यात किती तथ्य आहे, याबाबत कोणालाही अजून माहिती नाही.

(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)