मुंबई : बाजारात आलेल्या रेकॉर्ड तेजीनंतर आता काहीशी उतार-चढ दिसून येत आहे. दरम्यान काही शेअर्समध्ये गुंतवणूकीबाबत आउटलुक चांगले दिसून येत आहेत. सरकारी कोळसा उत्पादन कंपनी कोल इंडियाची ऑफटेक वॉल्यूम ग्रोथ वाढली आहे. त्यामुळे किंमती वाढण्याची शक्यात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील चाल पाहता ब्रोकरेज हाऊस या कंपनीच्या शेअरवर बुलिश दिसून येत आहेत.
200 रुपयांहून कमी किमतीच्या या शेअरने गेल्या वर्षभरात 62 टक्के रिटर्न दिला असून पुढे देखील गुंतवणूकदारांना शानदार रिटर्न देण्याची क्षमता आहे. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सेक्युरिटीजने कोल इंडियामध्ये 234 रुपये टार्गेटने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
Coal India : 38% हून जास्त रिटर्न्सची शक्यता
शेअर बाजाराचे वॅल्युएशन सध्या वाढले आहे. अशातच अनेक शेअर महाग झाले आहेत. कोल इंडियाच्या शेअरचे वॅल्युएशन देखील वाढले आहे. आयसीआयसीआय सेक्युरिटीजने या शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला देऊन 234 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या या शेअरची किंमत 169 च्या आसपास ट्रेड करीत आहे. या किंमतीवरून टार्गेट पूर्ण झाल्यास गुंतवणूकदारांना 38 टक्क्यांहून जास्तचा रिटर्न मिळू शकतो.
ब्रोकरेज रिपोर्ट
ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सेक्युरिटीजच्या रिपोर्टनुसार ऑक्टोबर 2021मध्ये कंपनीचा ऑफटेक वॅल्युम 11 टक्के वार्षिक पेक्षाही जास्त होता. आर्थिक वर्ष 2022 मध्ये शेअर ऑल टाईम हायवर पोहचू शकतो. ऊर्जेची वाढती मागणी, चीनमध्ये कोळशाची कमतरता इत्यादी यामागची कारणं ठरू शकतात.
याशिवाय कोल इंडिया मॅनेजमेंटने सध्याच्या परिस्थितीनुसार किंमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. आयसीआयसीआय सेक्युरिटीजने कोल इंडियावर BUY रेटिंग देत 234 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, कंपनी 20-25 रुपये प्रति शेअर लाभांश देऊ शकते.
-
(सूचना - येथे शेअरमध्ये देण्यात आलेला गुंतवणूकीचा सल्ला ब्रोकरेज हाऊसद्वारे देण्यात आला आहे. गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घ्या )