नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी उपस्थित राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.

Updated: May 29, 2019, 05:28 PM IST
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी उपस्थित राहणार title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शपथविधीला येण्यास नकार दिला आहे. पण यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार, मोदींच्या या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रपती भवनात जवळपास ६५०० जण उपस्थित राहणार आहेत. २०१४ मध्ये मोदींच्या शपथविधीला ५००० जणं उपस्थित होतं. चौथ्यांदा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा शपथविधी सोहळा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात 'बे ऑफ बंगाल इनिशिएटीव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल एंड इकॉनॉमिक कोऑपरेशन'(BIMSTEC)म्हणजेच बिमस्टेकचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बिमस्टेकमध्ये भारतासोबतच बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूटान देश सहभागी आहेत.