मुंबई : कोरोना व्हायरचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. भारतात गेल्या २४ तासांमध्ये ६९ हजार ९२१ नव्या रुणांची नोंद झाली असून ८१९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३६ लाख ९१ हजार १६७ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ६५ हजार २८८ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
Single-day spike of 69,921 new positive cases & 819 deaths reported in India, in the last 24 hours.#COVID19 case tally in the country stands at 36,91,167 including 7,85,996 active cases, 28,39,883 cured/discharged/migrated & 65,288 deaths: Health Ministry pic.twitter.com/uQYh0ViARW
— ANI (@ANI) September 1, 2020
अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ७ लाख ८५ हजार ९९६ रुग्णांवर उपचार सुरू असून २८ लाख ३९ हजार २८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी अनेक स्तरांमधून विविध उपाय राबवले जात आहेत. तरी देखील कोरोनाचा उद्रेकचा थांबत नसल्याचं चित्र संपूर्ण जगासमोर आहे. गेल्या काही महिन्यांपासून फैलत असलेल्या कोरोना विषाणूमुळे देशाची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे. सर्वच देश या महामारीमुळे आलेल्या संकटांना तोंड देत आहेत.