दोन वाघिणींच्या भांडणात जेव्हा बिबट्यामधे पडतो... पुढे काय घडतं, जाणून घ्या

वाघाला हे अजिबात सहन होत नाही, जेव्हा कोणता दुसरा प्राणी त्याच्यामध्ये येईल आणि जर कोणी त्यामध्ये पडलं, तर त्याची खैर नाही.

Updated: Mar 1, 2022, 05:08 PM IST
दोन वाघिणींच्या भांडणात जेव्हा बिबट्यामधे पडतो... पुढे काय घडतं, जाणून घ्या title=

मुंबई : सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. पण वाघ देखील कमी नाही, वाघ हा आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्यामुळे त्याचा दबदबा हा सिंहा सारखाच असतो.  हे लक्षात ठेवा की, वाघाला हे अजिबात सहन होत नाही, जेव्हा कोणता दुसरा प्राणी त्याच्यामध्ये येईल आणि जर कोणी त्यामध्ये पडलं, तर त्याची खैर नाही. असाच प्रकार एका प्राण्याने केला, ज्यामुळे हे सगळं करणं त्याच्या जिवावर बेतलं. खरंतर या घटनेचा कोणताही व्हिडीओ समोर आलेलं नाही. परंतु व्यघ्र प्रकल्पसंदर्भातील एका अकाउंटवरुन एक अशी माहिती सांगण्यात आली, जी एकताना तुमच्या देखील अंगावर काटा उभा राहिल.

ट्विटरवर @KashifKakvi नावाच्या युजरने मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पाची कथा शेअर केली आहे. प्रतिकात्मक फोटो शेअर करताना युजरने घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती सांगितली.

त्याने सांगितले की. जंगलात दोन वाघिणींमध्ये भांडण झाले होते. एका वाघिणीवर दुसऱ्या वाघिणीने हल्ला केला. त्यामुळे ती जबर जखमी झाली. त्याचवेळी एक बिबट्या तेथे आला आणि त्याने या प्रकरणात हस्तक्षेप केला. याचा फायदा घेत जखमी वाघिणीने तेथू पळ काढला. परंतु असं केल्यामुळे या वाघिणीला बिबट्याचा राग आला आणि तिने बिबट्याला मारण्यासाठी त्याचा पाठलाग सुरू केला.

काही अंतर पळून गेल्यावर वाघिणीपासून आपण सुटू शकणार नाही हे लक्षात येताच बिबट्या जंगलातील एका झाडावर चढला आणि उंच जाऊन बसला, यादरम्यान खाली उभी असलेली वाघीण रागाने त्याच्याकडे पाहात आणि डरकाळी फोडत होती.

काही वेळाने संधी साधून बिबट्याने झाडावरून खाली उतरून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु वाघिण तेथेच उपस्थीत होती, ज्यामुळे वाघाला पळून जाता आलं नाही. यानंतर घाबरलेला बिबट्या पुन्हा झाडावर चढला. हा असा प्रकार 3 वेळा घडला.

वाघिणीच्या पाठोपाठ बिबट्या खाली उतरला

युजरने लिहिले की, जेव्हा बिबट्याला समजले की, आता येथून पळून जाणे कठीण आहे, तेव्हा त्याने वेगळा मार्ग शोधला. तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारू लागला. पण वाघिणीला इतका राग आला की ती अजूनही त्याच्या मागे लागली. दुपारी ३ नंतर ती तिथून निघाली. काही मिनिटांनी एक थकलेला बिबट्या खाली आला आणि तेथून निघून गेला.

वनविभागाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी वाघिणीला शोधून तिच्यावर उपचार केले.

माहितीनुसार, बांधवगड व्याघ्र प्रकल्पात 124 वाघ आहेत. त्यात 2021 मध्ये 41 नवीन शावकांचा जन्म झाला.