'या' चिमुकल्यांनी केला floccinaucinihilipilification चा उच्चार, शशी थरुरही थक्क

काहींनी तर या शब्दाचा उच्चार करण्यासाठी तासन् तासांचा वेळही दिला. पण...

Updated: Oct 13, 2018, 08:31 AM IST
'या' चिमुकल्यांनी केला floccinaucinihilipilification चा उच्चार, शशी थरुरही थक्क title=

मुंबई: काँग्रेस नेते शशी थरुर यांनी काही दिवसांपूर्वीच केलेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर सध्या एकाच शब्दाची चर्चा सुरु आहे. किंबहुना अनेकांनीच या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी इंटरनेटटचा आधार घेतल्याचं पाहायला मिळालं. 

floccinaucinihilipilification असा हा शब्द असून, त्याचं स्पेलिंगच पाहून अनेकांना घाम फुटला. काहींनी तर या शब्दाचा उच्चार करण्यासाठी तासन् तासांचा वेळही दिला. अशा या शब्दाचा उच्चार भल्याभल्यांना जमला नसला तरीही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंच्या माध्यमातून चिमुरड्यांनी हा शब्द तितक्याच शिताफीने उच्चारुन दाखवला आहे. 

खुद्द शशी थरुर यांनीही ट्विट करत एका चिमुलकीच्या व्हिडिओसंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. 'किती निरागस आहे ही मुलगी, मी या वयात असताना हे करुही शकलो नसतो', असं त्यांनी ट्विट केलं. 

दरम्यान, आपल्या पुस्तकाबाबत माहिती देताना थरूर यांनी इंग्रजी शब्द ‘फ्लोक्सिनॉसिनिहिलिपिलिफिकेशन’ चा वापर केला होता. ‘माझं नवं पुस्तक, ‘द पेराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर…यामध्ये ४०० पानांव्यतिरिक्त ‘फ्लोक्सिनॉसिनिहिलिपिलिफिकेशन’वर मी मेहनत घेतली आहे’, असं ट्विट त्यांनी केलं होतं. 

या ट्विटनंतर ‘फ्लोक्सिनॉसिनिहिलिपिलिफिकेशन’ या शब्दाचा अर्थ आणि उच्चार याबाबत युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात कुतूहल पाहायला मिळालं.

काय आहे या शब्दाचा अर्थ? 

फ्लोक्सिनॉसिनिहिलिपिलिफिकेशन floccinaucinihilipilification म्हणजे ‘विनाकारण कोणतीही गोष्ट निरर्थक ठरविण्याची सवय.’