नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने जवळपास २००० रुपयांच्या नोटा छापणे आता बंद केलं आहे. आताच्या आर्थिक वर्षात आता २००० रुपयांच्या नवीन नोटा छापण्याची शक्यता कमीच आहे. रिझर्व्ह बँकेचे लक्ष आता २०० रुपयांच्या नवीन नोटेच्या छपाईवर आहे.
म्हैसूरमधल्या आरबीआयच्या नोटा छपाईच्या कारखान्यात २०० रुपयांची नोट छापण्याची तयारी सुरु केली आहे. २०० रुपयांची नवी नोट पुढील महिन्यात येण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत 2000 रुपयांच्या एकूण 370 कोटींच्या नोटा छापल्या आहेत. जे नोटबंदीनंतर बंद झालेल्या 1000 रुपयांच्या नोटाच्या 630 कोटी रुपयांच्या नोटाच्या तुलनेत भरपूर आहे.
सध्या 90 टक्के प्रिंटिंग 500 रुपयांच्या नोटांचं होत आहे. आतापर्यंत 500 रुपयांच्या नोटांचं 1400 कोटींच्या नोटा छापल्या गेल्या आहेत. नोटबंदीमध्ये 500 रुपयांच्या 1570 कोटींच्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या.
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, नोटबंदीच्या आधी 4 नोव्हेंबरपर्यंत जितक्या मुल्याच्या नोटा चलनात होत्या तेवढ्या मुल्याच्या नोटा १४ जुलैपर्यंत चलनात आल्या आहेत.