राजस्थान: स्वातंत्र्य सेनानी बाळ गंगाधर टिळक यांचा उल्लेख 'दहशतवादाचे जनक' (father of terrorism)करण्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय राजस्थान बोर्डाच्या ८ वीच्या इंग्रजी माध्यमातील पुस्तकात असे म्हटले आहे. याबद्दल संतापाची लाट उसळल्यानंतर प्रकाशकांनी याला अनुवादकाकडून चूक झाल्याचे सांगत सारवासारव केली आहे. तर कॉंग्रेसने हे पुस्तक अभ्यासातून हटविण्याची जोरदार मागणी केलीए. राजस्थान पाठ्यपुस्तक बोर्ड हे हिंदीमध्ये पुस्तक प्रकाशित करतात. यासाठी मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमातील विद्यालयांसाठी मथुराच्या एका प्रकाशकाद्वारा संदर्भ पुस्तक वापरली जातात. पुस्तकाच्या २६७ वर १२ व्या धड्यात टिळकांबद्दल आक्षेपार्ह नोंद पाहायला मिळत आहे. टिळकांनी राष्ट्रीय आंदोलनाचा रस्ता दाखविला म्हणून त्या 'दहशतवादाचे जनक' म्हटले जाते. १८ आणि १९ व्या शतकातील राष्ट्रीय आंदोलनाबद्दल या पुस्तकात लिहिले आहे.
अनुवादकाकडुन ही चुक झाली असून ती सुधारण्यात आल्याचे प्रकाशकांनी सांगितले. हा देशाचा अपमान असल्याचे राजस्थान प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी सांगितले. स्वातंत्र्य सेनानींच्या प्रतिमेला ठेच पोहोचते आहे. हे खूप दुर्भाग्यपूर्ण असल्याचेही ते म्हणाले. ज्या पुस्तकात चुकीचा संदर्भ असेल त्या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणीही त्यांनी केली आहे.