नवी दिल्ली : भारतीय नौदलाची शानच न्यारी... पण, याच नौदलाच्या जाबाँज जवानांना कसं तयार केलं जातं... कशी असते नौदलाची ट्रेनिंग...? कोणत्या खडतर परिस्थितीला या जवानांना तोंड द्यावं लागतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहेत.
भारतीय नौसैनिक अकॅडमीमध्ये जवानांचं ट्रेनिंग कसं चालतं, हे पहिल्यांदाच नॅशनल जिओग्राफिक चॅनलच्या माध्यमातून जगासमोर येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी या स्पेशल कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येणार आहे.
केरळच्या कन्नूर स्थित नौसेना अकॅडमी तब्बल २५०० एकर जागेवर उभारली गेलीय. प्रत्येक वर्षी या अकॅडमीतून १२०० नौसैनिक ऑफिसर तयार केले जातात.
नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसरा, सध्या ६७ हजार नाविक आणि १२ हजार ऑफिसर आहेत. यामध्ये जवळपास १५ टक्के मनुष्यबळ वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी नौसैनिक अकॅडमीमध्ये ट्रेनिंग सुविधा विस्तारण्यावर भर दिला जातोय.