नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार नीरज शेखर यांना केवळ १९ मिनीटांचे भाषण करण्यसाठी चक्क १५ तासांचा कालवधी लागला.
१९ मिनिटांचे भाषण आणि त्यासाठी १५ तासांचा कालावधी! ही बाब वास्तवातही मनाला पटणारी नाही. पण, असे घडले आहे खरे. घटना घडली भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत. आपल्या मतदारसंघातील जनतेच्या समस्या, प्रश्न मांडण्यासाठी संसदेत प्रत्येक खासदाराला वेळ दिला जातो. दिलेल्या वेळेनुसार खासदार आपल्या जनतेच्या समस्या सरकारसमोर मांडतात. पण, संसदेचे कामकाज सुरू असताना विरोधकांची आक्रमकता आणि सरकारसोबतचा संघर्ष त्यातून सभागृहात निर्माण झालेला गोंधळ. यामुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज अनेक वेळा स्थगित करावे लागले. स्थगिती मुळे वाया गेलेला वेळ चक्क १५ तासांचा होता.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, हा प्रकार घडला. सभापतींनी खासदार नीरज शेखर यांना बोलन्याची परवानगी दिली. त्यानुसार शुक्रवारी १२ वाजता ते बोलण्यासाठी उठले. मात्र, काही मिनिटांतच तेलगू देसम पक्षाच्या सदस्यांनी विरोध दर्शवल्यामुळे सभागृहाचे कामगाज स्थगित करण्यात आले.
दरम्यान, जेवनाच्या सुट्टीनंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाले. शेखर यांनी बोलण्यास सुरूवात केली. मात्र, पुन्हा गोंधळ सुरू झाल्याने सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यामुळे शेखर यांच्या बोलण्यात वारंवार अडथळे आले.