प्रत्येकाला विचार करायला लावणारी बातमी! मोबाईल गेम खेळण्यापासून थांबवलं, मुलाचा आईवर हल्ला

मुलांच्या आयुष्यावर मोबाईलचा विळखा किती घट्ट झालाय, याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. आईने मुलाला मोबाईल गेम खेळण्यापासून रोखल्याने त्या मुलाने चक्क आईवर हल्ला केला. या हल्ल्यात आईचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 14, 2023, 06:15 PM IST
प्रत्येकाला विचार करायला लावणारी बातमी! मोबाईल गेम खेळण्यापासून थांबवलं, मुलाचा आईवर हल्ला title=

Mobile Addiction : अन्न, पाणी आणि निवारा याबरोबरच आता मोबाईलही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोठ्या माणसांपासून लहान मुलांपर्यंत प्रत्येकाच्या हाती मोबाईल आले आहेत. कोरोना काळात सर्वच कामं वर्क फ्रॉम होम झाली आणि यात शाळाही ऑनलाईन झाल्या. अगदी केजीपासून मुलांच्या हातात मोबाईल आणि आता मोबाईलची सवयच झाली आहे.  हातात मोबाईल असल्याशिवाय मुलं जेवायलाच बघत नाही. टिव्हीवर कार्टुन बघणं, गाणी ऐकणं, मैदानावर खेळ खेळणं हे आता मागे पडत चाललं आहे. पण मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलं त्याच्या अधीन गेलीत. 

मोबाईल हातात नसला की मुलं बैचेन व्हायला लागली आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिल्याने एका मुलाने आपल्या आईवरच हल्ला केला. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. ही केवळ एक बातमी नाहीए, तर आपल्या प्रत्येकाला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. मुलांच्या हातात मोबाईल देऊन आपण आपल्या कामात व्यस्त होऊन जातो. पण मोबाईलचा विळखा मुलांच्या आयुष्यावर घट्ट होत चालला आहे याचं हे एक उदाहरण आहे. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. 

केरळमधली धक्कादायक घटना
केरळमधल्या कन्नूर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. इथल्या कनिचिरा गावात राहणारी 63 वर्षांची रुक्मिणी नावाची महिला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णलयात दाखल होती. गेल्या एक आठवड्यापासून रुक्मिमीवर उपचार सुरु होते. पण शनिवारी तिची मृत्यूची झुंज संपली. रुक्मिणीच्या मृत्यूचं कारण ठरलं मुलाचं मोबाईल व्यसन.

रुक्मिणी यांचा मुलाग सुजीत याला मोबाईलचं व्यसन जडलं होतं. दिवसरात्र तो मोबाईलमध्य् गुंतलेला असायचा. याच गोष्टीवरुन रुक्मिणी त्याला ओरडायच्या. घटनेच्या दिवशीही सुजीत मोबाईलमध्ये गेम खेळत होता. रक्मिणी यांनी त्याला मोबाईलमध्ये खेळण्यापासून रोखलं. याचा सुजीतला राग आला संतापलेल्या सुजीतने आईला मारहाण सुरुवात केली. यावरच तो थांबला नाही त्याने आईचं डोकं भिंतीवर जोरात आपटलं, यात रुक्मिणी गंभीर जखमी झाल्या. त्याना आसपासच्या लोकांनी रुग्णालयात दाखल केलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी सुजीत याला ताब्यात घेतलं. पोलीस तपासात सुजीतने आईची हत्या केल्याची कबुली दिली. 

मुलाने कबुल केला गुन्हा
आईने मोबाईलवर खेळण्यापासून रोखल्याने तिची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. आरोपीची मानसिक स्थिती ठिक नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. काही महिन्यांआधी त्याला कोझिकोड इथल्या कुथिरावट्टम इथल्या सरकारी मनोरग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.