Bear Save Crops:तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यातील शेतकरी माकडे आणि रानडुकरांच्या दहशतीमुळे हैराण झाले आहेत. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके रानडुक्कर आणि माकडांमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे दिवसभर शेतात बसून प्राण्यांना हुसकावने सोपे नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत होते. यातून सुटका करण्यासाठी भास्कर रेड्डी नावाच्या शेतकऱ्याने एक भारी मार्ग शोधून काढला.
Bear Save Crops : वन्य प्राणी आणि माकडे अनेकदा शेतातील उभी पिकांची नासाडी करतात. त्यामुळे शेतकरी प्रचंड हैराण आहेत. या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी एका शेतकऱ्याने अतिशय चपखल पद्धत अवलंबली आहे. आता या शेतकऱ्याला 'अस्वल' आपल्या शेताचे रक्षण करते. आश्चर्यचकित झाले की काय झाले, नाही का? वास्तविक, शेतकऱ्याने अस्वलाचा पोशाख परिधान करून शेताचे रक्षण करणाऱ्या एका व्यक्तीला कामावर ठेवले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या यूट्यूब चॅनलवर याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके रानडुक्कर आणि माकडांमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे भास्कर रेड्डी नावाच्या शेतकऱ्याने एक अप्रतिम मार्ग शोधून काढला.
भास्कर रेड्डी यांनी आपल्या पिकांच्या रक्षणासाठी 'अस्वल' कामाला ठेवला आहे. एवढेच नाही तर शेतकरी या अस्वलाला 500 रुपये रोजंदारीही देतो. आता त्याच्या शेतात माकडे आणि रानडुकरे वावरत नाहीत आणि शेतकऱ्यालाही शांतपणे झोप लागते. हे अस्वल दिवसभर शेतकर्यांच्या शेतात त्यांच्या पिकांचे रक्षण करत असते. अस्वलाला दुरून पाहून माकड आणि रानडुक्कर पळून जातात.
व्हिडिओ पहा-
एएनआयच्या रिपोर्टनुसार, जेव्हा भास्कर रेड्डी यांची पिके नासाडी होऊ लागली, तेव्हा त्यांच्या मनात एक कल्पना आली. त्यांनी अस्वलाचा पोशाख घातलेल्या माणसाला त्याच्या शेतात पहारा देण्यासाठी ठेवले. भास्करची ही कल्पना प्रभावी ठरली आणि त्यांच्या शेताला माकडे आणि रानडुकरांपासून संरक्षण मिळाले.