रेल्वेचे प्रवाशांसाठी मोठे गिफ्ट, आजपासून दहा नव्या रेल्वे

 भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी त्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. 

Updated: Oct 15, 2019, 11:44 AM IST
रेल्वेचे प्रवाशांसाठी मोठे गिफ्ट, आजपासून दहा नव्या रेल्वे  title=

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी त्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. आजपासून १० नव्या ट्रेन सुरु होणार असून हजारो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. आज दुपारी २ वाजता रेल्वेमंत्री पियूष गोयल, केंद्रीय आरोग्यमंत्री डाँ. हर्षवर्धन आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हे रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 

सेवा सर्व्हिस नावाने सुरु होत असलेल्या या सर्व ट्रेन पॅसेंजर ट्रेन आहेत. यातील काही दररोज तर काही आठवड्यातील सहा दिवस धावणार आहेत. दिल्ली आणि शामली, भुवनेश्वर आणि नारायगड शहर, मुरकंगसेलेक आणि डिब्रूगड, कोटा आणि झालावाड तसेच कोयंबटूर आणि पलानी दरम्यान या ट्रेन दररोज धावतील. 

याशिवाय सर्व्हिस ट्रेन आठवड्यात सहा दिवस धावतील. यामध्ये वडनगर आणि महेसाणा, असारवा आणि हिंमतनगर, करुर आणि सलेम, यशवंतपूर आणि तुमुकूर आणि कोयंबटूर- पोल्लाची दरम्यान धावणाऱ्या ट्रेन आहेत. रेल्वेने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर यासंदर्भात माहिती दिली आहे.