नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आपल्या ट्विटरवर भारतीय सेनेतील जवानांचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जवान बर्फवृष्टीमध्ये गरबा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ महानवमी आणि दसऱ्यासाठी समर्प्रित करण्यात आला आहे.
भारतीय सेनेच्या जवानांचा अभिमान आहे. उणे शून्य डिग्री तापमानात आपले जवान गरबा खेळत नवरात्रोत्सव साजारा करत आहेत. हीच भावना भारताला सर्वांपासून वेगळं सिद्ध करते, असं म्हणत डॉ. जितेंद्र सिंह यांनी ट्विटरवर हा गरबा खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Proud Soldiers of #IndianArmy celebrate and perform Garba in chilling Sub-Zero degree temperature. That is the spirit that makes India invincible ... Kuchh Baat Hai Ki Hasti Mit-ti Nahin Hamari !#Mahanavami #Dussehra pic.twitter.com/S3cXbpnjIJ
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) October 7, 2019
दिवाळीपूर्वीच हिमालयातील डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत असल्याचे चित्र आहे. लाहौल-स्पीती आणि कुल्लूमध्ये सोमवारी जोरदार बर्फवृष्टी झाली. बर्फवृष्टीमुळे रोहतांगजवळ मनाली-लेह महामार्गावर वाहतूककोंडी झाली.
Himachal Pradesh: Higher reaches of Lahaul-Spiti and Kullu districts received snowfall today. pic.twitter.com/wOUk5AzE3j
— ANI (@ANI) October 7, 2019
केलाँग, मनाली मार्गावरही सर्व बसेस थांबवण्यात आल्या आहेत.