गटारात स्वच्छतेसाठी उतरलेल्या ५ कर्मचाऱ्यांचा श्वास कोंडून मृत्यू

गटार स्वच्छ करण्यासाठी आत उतरलेल्या कर्मचाऱ्यांचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार 

Updated: Aug 22, 2019, 04:23 PM IST
गटारात स्वच्छतेसाठी उतरलेल्या ५ कर्मचाऱ्यांचा श्वास कोंडून मृत्यू  title=

गाझियाबाद : गाझियाबादमध्ये गटार स्वच्छ करण्यासाठी आत उतरलेल्या कर्मचाऱ्यांचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधील नंदग्राम विभागात ही घटना घडली आहे. या कर्मचाऱ्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले तर इतर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

कृष्णाकुंजमध्ये गटाराची आणि पाणी विभागाची पाईप लाईन टाकली जात होती. गटारात स्वच्छतेसाठी दोन कर्मचारी उतरले होते.  दोघेही खूप वेळ बाहेर आलेच नाहीत. त्यानंतर आणखी दोघे त्यांना पाहण्यासाठी आत उतरले.त्यानंतर अजून एक कर्मचारी गटारात उतरला. तीन कर्मचाऱ्यांचा घटनास्थळीच तर इतर दोघांचा उपचादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

या प्रकरणानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाचही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेची माहिती मिळचाच कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. घटनेची अधिक चौकशी सुरु आहे.