Stock Market Scam : प्रत्येकाला वाटतं आपण कमी मेहनत करुन क्षणात श्रीमंत व्हाव. त्यासाठी कधी लॉटरीच तिकीट तर कधी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो. हेच लक्षात घेऊन तुमची फसवणूक करणारेही तुमच्या आजूबाजूला सक्रीय असतात. तुमची एक चूक तुम्हाला श्रीमंत नाही तर एका क्षणात मेहनतीने कमावलेले पैसेही गमावून बसता. शेअर बाजारातून भरमसाठ नफा कमावण्याच्या 'ट्रिक' दाखवून फसवणूक करणारे दररोज लोकांची फसवणूक झाल्याच्या अनके घटना आपण ऐकत असतो. सरकार आणि प्रसारमाध्यमांमधून वरच्यावर जनजागृती करत असतात. पण तरीदेखील काही न करताना कोट्यधीश होण्यासाठी आपण आपली जीवनभराची कमाई गमावून बसतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय. (couple loses 70 lakh in share market Broke FD withdrew money from mutual fund)
झालं असं की, नोएडाच्या सेक्टर 10, अमत्रा होम्समध्ये आपल्या कुटुंबासोबत राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेला काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केलं होतं. त्या ग्रुपवर शेअर ट्रेडिंग शिकवू असं सांगण्यात आलं होतं. काही दिवसांनंतर, त्यांना मोबाइल ॲप डाउनलोड करण्यासाठी आणि काही 'प्लॅन'मध्ये पैसे गुंतवण्यास प्रोत्साहित देण्यात आले. 300 टक्क्यांपर्यंत नफा कमावता येईल असे सांगून फसवणूक करणाऱ्यांनी महिलेला सांगितलं. महिलेने श्रीमंत होण्यासाठी त्यांच्या जाळ्यात अडकली आणि तिने ॲप डाऊनलोड करून काही पैसे गुंतवले.
तिने पैसे गुंतवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ॲपने मोठा नफा दाखवला. यानंतर महिला आणि तिच्या पतीला दुसऱ्या खासगी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आलं. त्यांना 30 लाख रुपये गुंतवून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आलं. दोघांनी 20 लाख रुपये गुंतवले. काही वेळाने फसवणूक करणाऱ्यांनी त्याला सांगितले की 20 लाख रुपये गुंतवून 50 लाख रुपयांचा फायदा झाला आहे. त्यांनी दोघांना फसवून आयपीओचे एक लाख शेअर्स मिळवून दिले आणि त्यांना 1.19 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितलं. तसंच त्यांच्या ॲप खात्यात भरपूर पैसे जमा आहेत, त्यामुळे त्यांना 1.19 कोटींऐवजी फक्त 48 लाख रुपये जमा करावे लागतील, असं सांगितलं.
महिलेने नफा कमवण्यासाठी नवऱ्याच्याही मागे लागली. त्यांनी आणखी काही रक्कम मागितली. दोघांनीही त्यांच्या मुदत ठेवी आणि म्युच्युअल फंडातून पैसे काढले. एवढंच नाही तर मित्र आणि नातेवाईकांकडून काही पैसे उधार घेऊन ते जमा केले. त्यानंतर त्याच्याकडे पुन्हा कर आणि शुल्काच्या नावाखाली 21 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. कोट्यवधी रुपये कमावण्याच्या नादात या जोडप्याने गेल्या दोन महिन्यांत सुमारे 70 लाख रुपये गमावले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी एफआयआर दाखल करून भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 318 आणि 319 आणि आयटी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय.