मुंबई : देशात आज मंगळवारी रात्री उशिरा तीन तास खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. रात्री १ वाजून ३१ मिटांनी हे चंद्रग्रहण सुरु होणार आहे. ते पहाटे तीन वाजेपर्यंत चंद्राचा जास्त भाग झाकोळलेला असणार आहे. हे खंडग्राह चंद्रग्रहण पहाटे ४.२९ मिनिटे दिसणार आहे. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून दिसणार आहे.
गुरुपौर्णिमेलाच यंदा खंडग्रास चंद्रग्रहणही होणार आहे. रात्री दीड वाजता ग्रहण स्पर्श होईल आणि पहाटे साडे चार वाजता ग्रहण संपेल.#LunarEclipse pic.twitter.com/r1SGt83UKC
— AIR News Pune (@airnews_pune) July 16, 2019
खंडग्रास चंद्रग्रहणाचा प्रारंभ मंगळवारी रात्री उशिरा म्हणजेच १ वाजून ३१ मिनिटांनी होईल. यावेळी ६५.३ टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेमध्ये येईल. त्यानंतर पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी चंद्रग्रहण पूर्णपणे सुटणार आहे. आजचे खंडग्रास चंद्रग्रहण सरॉस चक्र क्रमांक १३९मधील आहे.
ते खंडग्रास चंद्रग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंड, संपूर्ण युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, रशियाचा दक्षिण भाग, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथून दिसेल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असले तरी गुरुपौर्णिमा दरवर्षीप्रमाणे साजरी करता येईल, असे पंचांग कर्त्यांनी स्पष्ट केले आहे. शास्त्रानुसार चंद्रग्रहणाचे वेध नऊ तास आधी सुरू होतात, तर सूर्यग्रहणाचे वेध १२ तास आधी सुरू होतात. आजचे खंडग्रास चंद्रग्रहणाचे वेध रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी सुरु होणार आहेत.