अॅमेझॉनचा 'ग्रेट इंडिया फेस्टिवल'सेल आजपासून सुरू, स्मार्टफोनवर धमाकेदार डिस्काऊंट

ऑनलाईन सेवा देणारी कंपनी अॅमेझॉनचा 'ग्रेट इंडिया फेस्टिवल' आजपासून (बुधवार, २० सप्टें.) सुरू होत आहे. अॅमेझॉनची स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टने काल (मंगळवार, १९ सप्टें) मध्यरात्रीच आपल्या 'बिग बिलियन डे' सेलला सुरूवात केली आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या स्पर्धेत ग्राहकांना फायदा होणार आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 20, 2017, 05:11 PM IST
अॅमेझॉनचा 'ग्रेट इंडिया फेस्टिवल'सेल आजपासून सुरू, स्मार्टफोनवर धमाकेदार डिस्काऊंट title=

नवी दिल्ली : ऑनलाईन सेवा देणारी कंपनी अॅमेझॉनचा 'ग्रेट इंडिया फेस्टिवल' आजपासून (बुधवार, २० सप्टें.) सुरू होत आहे. अॅमेझॉनची स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टने काल (मंगळवार, १९ सप्टें) मध्यरात्रीच आपल्या 'बिग बिलियन डे' सेलला सुरूवात केली आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या स्पर्धेत ग्राहकांना फायदा होणार आहे.

अॅमेझॉनचा 'ग्रेट इंडिया फेस्टिवल' २१ ते २४ सप्टेबर या कालावधीत सुरू राहणार आहे. मात्र, अॅमेझॉनच्या प्राईम मेंबर्ससाठी हा सेल २० सप्टेबरला दुपारी १२ वाजलेपासूनच सुरू झाला आहे.
ग्रेट इंडिया फेस्टिवलमध्ये ५००हून अधिक कंपन्या प्रत्येक तासाला नवी ऑफर देणार आहेत. सेलमध्ये स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप, कॉम्प्यूटर, कपडे, फॅशनेबल एक्सेसरीज तसेच, अनेक घरोपयोगी वस्तू उपलब्ध असणार आहेत. सोबतच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ५०ते ६० टक्के डिस्काऊंटही मिळणार आहे. जे ग्राहक या सेलचा फायदा उठवतील अशा ग्राहकांची चांगलीच चंगळ होणार आहे.

सेलदरम्यान, सॅमसंग, अॅपल, वनप्लस, यांसारख्या ब्रॅन्डेड मोबाईलवरही ४० टक्क्यांपर्यंतची सुट मिळण्याची शक्यता आहे. तर, लॅपटॉप, कॅमेरा यांवरही गलेलठ्ठ सुट मिळणार आहे. सेलदरम्यान, एच.डी.एफ.सी. बॅंकेचे क्रेडीट आणि डेबिट कार्ड वापरून खरेदी केल्यास १० टक्के कॅशबॅक ऑफरही उपलब्ध असणार आहे.