Video : हा बाबा धर्माच्या नावाखाली करत होता लैंगिक अत्याचार

दिल्लीत एका स्वघोषित बाबा खोटा चेहरा समोर आला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 27, 2017, 08:41 PM IST
Video : हा बाबा धर्माच्या नावाखाली करत होता लैंगिक अत्याचार  title=

नवी दिल्ली : दिल्लीत एका स्वघोषित बाबा खोटा चेहरा समोर आला आहे. 

विरेंद्र दीक्षितचा या बाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या बाबाच्या चेहऱ्या मागील क्रूर व्यक्ती समोर आली आहे. धर्माच्या नावाखाली या बाबाने अनेक चुकीची कामे केली असल्याची माहिती मिळाली आहे. हा संपूर्ण प्रकार धर्मनगरीशी जोडली आहे. या बाबाचा चांगला चोप दिल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

काय आहे या व्हिडिओत? 

या व्हिडिओत बाबाला काठ्यांना मारझोड केल्याचं दिसत आहे. बाबावर आरोप आहे की त्याने अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहे. पोलिसांनी बाबाला अटक करून चौकशी करायला सुरूवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबाचे नाव भगवताचार्य बासुदेव शास्त्री असं सांगितलं जातं आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या दोन तरूणींनी आरोप केला आहे की, बाबा त्यांना भागवत शिकवण्यासाठी घेऊन आला होता. काही महिन्यांनी बाबा त्यांच्यासोबत अश्लिल फोटो काढून जबरदस्ती शोषण करू लागला. 

असं सांगण्यात येत आहे की, दिल्लीतील रोहिणी परिसरातून धर्माच्या नावाखाली यौनशोषण करणाऱ्या या बाबाच्या आश्रमातून अनेक मुलींना मुक्त केलं आहे. रोहिणी परिसरातील विजय विहारमध्ये बाबा वीरेंद्र देव दीक्षित आध्यात्मिक विश्वविद्यालय नावाचे आश्रम चालवत असे. अनेक लोकांनी आरोप लावले आहेत की, बाबा इथे बंधक बनवून ठेवलेल्या मुलींसोबत चुकीचे काम करत असे. गुरूवारी हायकोर्टाकडून या टीमने 9 तास रेस्क्यू ऑपरेशन चालवलं आहे. यातून 41 तरूणींना मुक्त करण्यात आलं आहे.