Golden Teeth Thief Found after 15 years: आपल्यालाही असंच वाटतं राहतं की आपल्याकडेही भरपूर पैसा असावा त्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. काही प्रामाणिकपणे प्रयत्न करतात किंवा काहीजणं चोरी करत श्रीमंत (Rich) होण्याचा प्रयत्न करतात. त्यातून अशाच अनेक घटनाही आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याला अशा घटना ऐकल्यावर धक्का बसतो. सध्या अशीच एक घटना सगळीकडेच व्हायरल (Viral Video) होत आहे. शिताफिरीनं चोरी कशी करायची आणि ती कोणालाही कळू द्यायची नाही अशी चोरी करायला फारच मोठी बुद्धिमत्ता लागते. अशीच एक घटना समोर आली आहे. 15 वर्षांपूर्वी चोरी केली अशा एका चोराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अटक केली ती केलीच परंतु समोर एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. (a man with golden tooth was arrested by mumbai police after 15 years)
हा आरोपी गेल्या 15 वर्षांपासून फरार होता. एएनआय या वृत्तसंस्थेनं या व्यक्तीचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यातल्या एका फोटोत तो आहे आणि दुसऱ्या फोटोत त्याच्या दातांचा एक फोटो दिसतो आहे. या एजन्सीनं त्यांच्या रिपोर्टमध्ये (Report) लिहिलं आहे की, मुंबई पोलिसांनी 38 वर्षीय आरोपी प्रवीण आशुभा जडेजा याला अटक केली आहे. जे 15 वर्षांपासून फरार तर होताच पण त्याची तुम्ही कामगिरी वाचलीत तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
हे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंमध्ये नमूद केले आहे की त्यानं एका कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम केले आणि 2007 मध्ये एका दुकानदाराची 40,000 रूपयांची फसवणूक केली. मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यानं याबाबत एजन्सीला सांगितले आहे.
या व्यक्तीची ओळख त्याच्या सोन्याच्या दातांवरून निघाली. दुसऱ्या एका अहवालानुसार, आरोपीविरुद्ध एफआयआर 2007 मध्ये नोंदवण्यात आला होता. पकडले जाऊ नये म्हणून आरोपी नव्या ओळखीने जगत होता. एवढेच नाही तर त्याने आपला तळ मुंबईहून गुजरातमधील कच्छमध्ये हलवल्याचेही सांगितले जात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
या चोरानं व्यापाऱ्याकडून गोळा केलेले पैसे चोरीला गेल्याचे सांगून दुकानमालक आणि पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. प्रवीणनं टॉयलेटमधून पैशांची भरलेली बॅग कोणीतरी चोरल्याचे सांगून पोलिस आणि पोलिस आणि मालकाची दिशाभूल केली होती. अशीही माहिती समोर येते की, त्याला अटक झाली होती परंतु नंतर कॉर्टातूनही जामीन मिळाल्यानंतर तो फरार झाला असेही एका पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याचा पुन्हा तपास सुरू केला आणि मग कळलं की तो कच्छमध्ये आहे त्यानंतर त्याच्या साथीदारांकडून त्याला शोधून काढलं.