थंडीत घ्या तुमच्या कोमल ओठांची काळजी

आपल्याला सुंदर आणि आकर्षक बनविण्यात गुलाबी ओठ फार महत्त्वाची भूमिका पार पाडतात. सुंदर ओठ व्यक्तीचं सौंदर्य खुलवतात.  आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही घरच्या घरी तुमच्या ओठांना सुंदर बनवू शकाल.

Updated: Dec 29, 2017, 11:34 PM IST
थंडीत घ्या तुमच्या कोमल ओठांची काळजी title=

मुंबई : आपल्याला सुंदर आणि आकर्षक बनविण्यात गुलाबी ओठ फार महत्त्वाची भूमिका पार पाडतात. सुंदर ओठ व्यक्तीचं सौंदर्य खुलवतात.  आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही घरच्या घरी तुमच्या ओठांना सुंदर बनवू शकाल.

लिपस्टिकचा अतिवापर टाळा

महिला आपल्या ओठांना सुंदर बनविण्यासाठी लिपस्टिक, मॉइश्चरायजर आणि इतरही काही वस्तूंचा वापर करतात. मात्र, अनेकदा असे समोर आलं आहे की, ओठांना लिप्स्टिक किंवा इतर काही वस्तूंचा वापर केल्याने ओठ काळे पडतात तसेच ओठ फाटतातही.

लिंबू आणि मध

लिंबामध्ये प्राकृतिक गुण असतात जे ओठांवरील काळे डाग दूर करतात. यासाठी एक चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबूचा रस घ्यावा. त्यानंतर दोघांचं चांगल्या प्रकारे मिश्रण करून ते ओठांवर लावावे.

गुलाबाच्या पाकळ्या

ओठांवरील काळेपण दूर करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या खुपच फायदेशीर ठरतात. याच्या नियमित वापराने ओठांचा रंग हल्का गुलाबी आणि चमकदार होतात. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या रात्रभर दूधात भिजत ठेवाव्यात आणि सकाळी उठल्यावर त्या ओठांवर लावाव्यात. मग, सुकल्यानंतर ओठांना धुवावे.

काळे मिरे

काळ्या मिऱ्याची पूड पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट जवळपास पाच ते दहा मिनिटे ओठांवर लावून ठेवा. त्यानंतर ओठ पाण्याने धुवून टाका.

दही आणि कोरफड

गुलाबी आणि कोमल ओठांसाठी दही आणि कोरफडीची पेस्ट खूपच उपयोगी ठरते.