मुंबई : कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय का? पण काही केल्या कमी होत नाहीये? यासाठीच आम्ही तुम्हाला एक चांगली कल्पना देणार आहोत. तुम्ही आंबा खाल्ल्यानंतर त्याची बाट फेकून देता का, असं अजिबात करू नका. आंब्याची बाट तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. आंब्याचे सेवन करून तुम्ही शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करू शकता. याशिवाय यातून अनेक मोठे फायदेही मिळतात.
फक्त आंबाच नाही तर त्याची बाट देखील तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही आंब्याच्या कोयीचं सेवन केलं तर तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास देखील मदत मिळेल. याशिवाय पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही हे फायदेशीर आहेत.
डायबेटीज रूग्णांनीही आंब्याच्या कोयीचं सेवन केलं पाहिजे. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. याचाच अर्थ आंब्याची बाट ही मधुमेही रूग्णांसाठी फायदेशीर आहे.